दत्त-जयंती निमित्त विशेष पूजा !

॥ श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट ॥(४/१२/२५) चे वस्त्र अलंकार पूजन व दर्शन !

अक्कलकोटमध्ये ‘समर्थ महाप्रसाद सेवा’ला चार वर्षे पूर्ण; दत्त जयंतीनिमित्त लाभार्थ्यांना स्वेटर वाटप

अक्कलकोट (प्रतिनिधी) – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या समर्थ महाप्रसाद सेवा उपक्रमाला दत्त जयंती 2025 रोजी चार वर्षे पूर्ण झाली. संस्थापक अध्यक्ष श्री जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या…

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्नजिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि एन.ए.बी. संचलित निवासी अंध कार्यशाळेचा उपक्रम

सोलापूर :- आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर व एन.ए.बी. संचलित निवासी अंध कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे…

अतिवृष्टीचे १२७८ कोटी अनुदान वितरीत…अडचणीच्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा : आमदार राणाजगजितसिंह पाटील

यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकर्यांसना महायुती सरकारने जाहीर केलेल्या अनुदानापोटी ₹ १२७८ कोटी दिवाळीपासून आजवर शेतकर्यांनच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. अडचणीच्या काळात असलेल्या शेतकर्यांीना महायुती सरकारने दिलेल्या…

जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२५,२६ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले.

धाराशिव – जिल्हयातील उत्कृष्ट क्रीडा खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे,या उद्देशाने शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो.या वर्षी…

महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती

नागपूर खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व नगरपालिकांच्या मतमोजणीची तारीख 21 डिसेंबर ठरवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 21 डिसेंबरपर्यंत राज्यात आचारसंहिता लागू राहणार आहे. आज 2 डिसेंबर रोजी काही नगरपालिकांमध्ये…

नगरपालिका-नगर परिषद निवडणुकांबाबत नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय; मतमोजणी 21 डिसेंबरला

राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांबाबत आज मोठी घडामोड घडली आहे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या महत्वाच्या आदेशामुळे उद्या नियोजित असलेली मतमोजणी रद्द करण्यात आली असून आता सर्वच नगरपालिका निवडणुकांचे निकाल 21…

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात सरासरी 68.97 टक्के मतदान!

सर्वाधिक मतदान तुळजापूर नगरपालिकेत तब्बल 80.28 टक्के मतदान; तर धाराशिव नगरपालिकेसाठी 61.15 टक्के मतदान. नळदुर्ग – 73.17 उमरगा – 66.81 मुरूम – 67.41 कळंब – 72.69 भूम – 79.21 परंडा…

उद्याची मजमोजणी रद्द; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णयः सर्वच निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला; तोपर्यंत आचारसंहिता कायम. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा ताण-तणाव वाढत असताना, मतमोजणीच्या तारखेबाबत आता मोठा संभ्रम निर्माण दूर झाला आहे. सुरुवातीला राज्य निवडणूक आयोगाने 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होईल, असे सांगितले होते. मात्र काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये न्यायालयीन पेच निर्माण झाल्याने आयोगाने आपल्या कार्यक्रमात बदल करत, ज्या ठिकाणी वाद सुरू आहे, तेथे 20 डिसेंबर मतदान व 21 डिसेंबरला निकाल असा नवीन आदेश देऊन परिस्थिती अधिक गुंतागुंतीची केली होती. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यानुसार उद्याची मतमोजणी रद्द करण्यात आली आहे. आता 21 डिसेंबरलाच सर्व ठिकाणचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तोपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे.