धाराशिव येथे होलार समाज आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी फलकाचे ७ एप्रिल रोजी अनावरण

Spread the love

धाराशिव : होलार समाजाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून दि. ७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, धाराशिव येथे “होलार समाज आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी” या फलकाचे अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या फलकाचे अनावरण अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष मा.पंडित कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मराठवाडा अध्यक्ष साहित्यिक प्रा.वैजनाथ सुरनर, समाजाचे ज्येष्ठ नेते दगडोबा गेजगे, महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती संगीता पराते, मराठवाडा सचिव ॲड.शशिराज माने,जिल्हा संपर्क प्रमुख बाबा गुळीग,ॲड.के. बी.जाधव,कवी दीपक केंगार,पंढरी गुळवे,आप्पा आयवळे,रमेश केंगार व अनिल नामदास आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास धाराशिव जिल्ह्यातील होलार समाज बांधव, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन सचिन पारसे, लक्ष्मण कांबळे,विजय ढोबळे,मच्छिंद्र जावीर,रमेश गुळीव,बाळासाहेब कांबळे,राम कांबळे,सचिन गोरवे, किशोर गुळीग, आकाश आयवळे, परमेश्वर गोरवे,संतोष कांबळे, दत्ता हत्तीकर,आनंद हत्तीकर,अरुण जावीर,अमोल कांबळे आणि विनोद पारसे यांनी केले आहे.
हा सोहळा होलार समाजाच्या संघटनात्मक बळकटीसह आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना समाजबांधवांत व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    तगर भूमी जेतवन बुद्ध विहारात वर्षावास महोत्सवाचे आयोजन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्षावास निमित्त निसर्गाच्या सानिध्यात तगर भुमी जेतवन बुद्ध विहार,गडदेवदरी परिसर,धाराशिव येथे वर्षावास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मौजे गडदेवदरी घाटंग्री परिसर ता.जि.धाराशिव येथे तीन…

    ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

    Spread the love

    Spread the loveईद-ए-मिलाद निमित्त नगरसेवक अझहर मुजावरांचा उपक्रम; एसीएम ग्रुपच्या रक्तदान शिबिरात २००-३०० युवकांचा सहभाग धाराशिव – “पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.)” यांच्या जन्मदिनी साजरा केला जाणारा ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांसाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *