
उमरगा : समाजातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय उपचार मिळावेत, तसेच त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा, या सेवाभावी उद्देशाने ज्ञानज्योती फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे.
ज्ञानज्योती फाउंडेशनच्या पुढाकारातून माडज येथील अवघ्या पाच वर्षांच्या आनंद बापू बनसोडे या चिमुकल्याच्या डोळ्यांच्या तिरळेपणाची (Squint) शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत व यशस्वीरीत्या करण्यात आली.
डोळ्यांच्या तिरळेपणामुळे या चिमुकल्याला भेडसावणारी समस्या दूर करण्यासाठी फाउंडेशनने पुढाकार घेतला. आवश्यक वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रियेची व्यवस्था करून देत फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
एका चिमुकल्याच्या चेहऱ्यावर पुन्हा सुंदर हास्य फुलविण्याचा हा छोटासा प्रयत्न असला, तरी त्यामागील सेवाभाव निश्चितच मोठा आहे. गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय मदत मिळवून देणे आणि त्यांच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण करणे हेच ज्ञानज्योती फाउंडेशनचे प्रमुख ध्येय आहे.
या उपक्रमामुळे ज्ञानज्योती फाउंडेशन, उमरगा यांच्या सामाजिक कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
॥ आपली सेवा, आमचा संकल्प ॥
ज्ञानज्योती फाउंडेशन, उमरगा
संपर्क : 7756875048