माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करा,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Spread the love

पेट्रोलपंप,सीएनजी पंप,रेशन पुरवठादार व गॅस एजन्सीधारकांच्या बैठकीत आवाहन

धाराशिव – देशाच्या सीमांचे रक्षण करताना आपले आयुष्य राष्ट्रसेवेसाठी समर्पित करणारे सैनिक आणि माजी सैनिक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे.देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी महत्त्वपूर्ण असून,या निधीस जिल्ह्यातील व्यापारी,व्यावसायिक आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांनी देणगी स्वरूपात सढळ हाताने मदत करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात २२ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील पेट्रोलपंपधारक,सीएनजी पंपधारक,रेशन पुरवठादार आणि गॅस एजन्सीधारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर आणि जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी उपस्थित व्यावसायिकांना ध्वजदिन निधीचे महत्त्व सांगून माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले.तसेच निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांनीही उपस्थितांना ध्वजदिन निधीस देणगी स्वरूपात सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले.

देशाच्या संरक्षणासाठी आपले कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या सेवेचा सन्मान राखणे आणि माजी सैनिकांच्या कल्याणासाठी योगदान देणे,हा ध्वजदिन निधी संकलनामागील महत्त्वाचा उद्देश आहे.समाजातील विविध घटकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या परीने योगदान दिल्यास माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना हातभार लागू शकतो.त्यामुळे जिल्ह्यातील व्यावसायिकांनी या सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत धाराशिव येथील सनी पेट्रोलियमचे सुनील काळे यांनी माजी सैनिकांच्या कल्याणार्थ ध्वजदिन निधीस ११ हजार रुपयांची देणगी दिली.त्यांनी ११ हजार रुपयांची देणगी निवासी उपजिल्हाधिकारी श्री.कडवकर यांच्याकडे सुपूर्द केली.

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी श्री.काळे यांनी दिलेले हे योगदान सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरले आहे.ध्वजदिन निधीसाठी जिल्ह्यातील इतर पेट्रोलपंपधारक, सीएनजी पंपधारक,रेशन पुरवठादार,गॅस एजन्सीधारक तसेच विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांनीही पुढाकार घेऊन सढळ हाताने मदत करावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Related Posts

    एन. व्ही. पी. शुगरची कामगारांना दिवाळीची मोठी भेट! कायम कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार बोनस; कर्मचाऱ्यांच्या कुटूंबातील महिलांना साडी-चोळी अन् मिठाईचे वाटप होणार

    Spread the love

    Spread the loveनव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनाही १५ दिवसांच्या पगाराइतका बोनस धाराशिव प्रतिनिधी : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह, आपुलकी आणि गोडव्याचा उत्सव! याच सणाच्या पार्श्वभूमीवर एन. व्ही. पी. शुगर प्रा.…

    दुःखाच्या छायेतही ३७ वर्षांची अन्नदान परंपरा अखंड!

    Spread the love

    Spread the loveकेतनच्या स्मृतींना उजाळा देत अग्रवाल परिवाराकडून पायी येणाऱ्या भाविकांची सेवा; ‘जस्टिस फॉर केतन’चा भावनिक संदेश तुळजापूर | सेवा, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडविणारा अग्रवाल परिवाराचा अन्नदान…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *