महामानवाचा महा जयंती महोत्सवात दिव्यांग बांधवासाठी शासकीय योजनांचा माहिती मेळाव्याचे आयोजन  समितीच्या वतीने मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन.

Spread the love

धाराशिव :- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त आयोजित फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवाचा महा जयंती महोत्सव सन २०२६ साजरा करण्यात येत आहे,या महोत्सवात प्रहार संघटना व फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समिती धाराशिवच्या वतीने दि.१३ एप्रिल रोजी दिव्यांग बांधवासाठी शासकीय योजनांचा माहिती मेळावा आयोजित केला असुन या मेळाव्यात विस शासकीय कार्यालयाचा सहभाग आहे तर यात आरोग्य शिबीराचे देखील नियोजन केले आहे,या मेळाव्याचे उद्घाटन उपाध्यक्ष मित्र संस्था तथा तुळजापूर आमदार मा.राणाजगजितसिंहजी पाटील,जिल्हाधिकारी डॉ किर्तीजी किरण पुजार साहेब,एसपी रितुजी खोखर,नगर परिषद मुख्याधिकारी निता अंधारे, तहसिलदार मृणाल जाधव सह इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार आहे,तरी आपण सर्वांनी दि.13 एप्रिल रोजी सकाळी ठिक १०:३० वाजता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत उपस्थित राहुन शासकीय योजनांचा माहिती मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे व सदस्य मयूर काकडे यांनी केले आहे.

  • Related Posts

    संविधान उद्देशिका वाचन करुन शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीची सुरुवात

    Spread the love

    Spread the love धाराशिव :- छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यात सामाजिक समता न्याय दिन साजरा केला जातो,या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद धाराशिव,समाज कल्याण विभाग धाराशिव यांच्या…

    छत्रपती संभाजी महाराजांनाजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *