
धाराशिव – हातलाई शुगर्स प्रा. लि. येथे सन २०२५-२६ च्या गळीत हंगामाच्या प्रारंभानिमित्त जॅगरी पावडरच्या पहिल्या ११ पोत्यांचे विधिवत पूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या पूजन सोहळ्यास हातलाई शुगर्स प्रा. लि.चे सर्वेसर्वा आदरणीय सुधीर अण्णा पाटील, चेअरमन अभिराम सुधीर पाटील, जनरल मॅनेजर गरड साहेब, चीफ इंजिनिअर खरसडे साहेब, चीफ केमिस्ट शेलके साहेब व इंजिनिअर जाधव साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
नैसर्गिक जॅगरी पावडरच्या उत्पादनातून ग्राहकांना उत्तम दर्जाचे उत्पादन देण्याच्या ध्येयाने हातलाई शुगर्स प्रा. लि. यशस्वी वाटचाल करत आहे. या शुभप्रसंगी कारखान्याच्या प्रगतीसाठी, उत्पादनात सातत्याने वाढ होण्यासाठी, सर्व कर्मचारी वर्गाच्या सुख-समृद्धीसाठी आणि शेतकरी बांधवांच्या भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली.
गुणवत्ता, नैसर्गिकता आणि विश्वास यांचा संगम म्हणजे हातलाई शुगर्स!
हातलाई शुगर्स प्रा. लि.च्या या यशस्वी वाटचालीत सहकार्य करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे, व्यापारी मित्रांचे, ग्राहकांचे आणि कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक आभार.
हातलाई शुगर्स प्रा. लि.च्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!