एन.व्ही.पी. शुगरकडून तिसऱ्या पंधरवाड्यातील शेतकऱ्यांना ५ कोटी ४९ लाखांचे ऊस बिल खात्यावर जमा!

Spread the love

पंधरा दिवसांत बिल अदा करण्याची परंपरा कायम; प्रतिटन ३,१०० रुपये दराने ऊस बिलाचे वितरण

जागजी |(प्रतिनिधी) – एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि., जागजी कारखान्याने चालू तृतीय गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये कारखान्याने गाळपासाठी आलेल्या ऊसाचे बिल वेळेत अदा करण्यावर भर दिला आहे. तिसऱ्या पंधरवाड्यात ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या १७ हजार ७३१ मेट्रिक टन ऊसाचे प्रतिटन ३,१०० रुपये दराने एकूण ५ कोटी ४९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत वर्ग करण्यात आले आहेत.

गळीत हंगाम सुरू झाल्यापासून दुष्काळी परस्थितीत एन. व्ही पी शुगर कारखान्याने शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे वेळेवर उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे दिवाळी पूर्वी गाळपास आलेल्या ऊस बिल पोटी १० कोटी ९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या घरात पोहचवण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिवाळी सण आनंदाचे साजरा करण्यात मदत होणार आहे.

एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि. जागजी कारखान्याने शेतकऱ्यांचे हित सर्वोच्चस्थानी ठेवून चाचणी गळीत हंगामापासूनच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अवघ्या पंधरा दिवसांत ऊसाचे बिल अदा करण्याची परंपरा सुरू केली आहे. एन.व्ही.पी. शुगर परिवाराने सुरू केलेली ही परंपरा चालू गळीत हंगामातही कायम ठेवली असून, वेळेत ऊस बिल मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नियोजनासाठी मदत होत आहे.

दरम्यान, ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या बँक खात्याशी संबंधित कागदपत्रे कारखान्याकडे जमा केलेली नाहीत, त्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.,धाराशिव येथील बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत कारखाना साईटवर जमा करावी, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन नानासाहेब ऊर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.

  • Related Posts

    ज्ञानज्योती फाउंडेशनच्या पुढाकारातून ५ वर्षीय चिमुकल्याची डोळ्यांची शस्त्रक्रिया मोफत; चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य!

    Spread the love

    Spread the loveउमरगा : समाजातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय उपचार मिळावेत, तसेच त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा, या सेवाभावी उद्देशाने ज्ञानज्योती फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने स्तुत्य सामाजिक उपक्रम…

    अ‍ॅड. अजित गुंड पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; धाराशिवमध्ये १२ ठिकाणी स्वच्छतागृहे उभारणार, ३.५० कोटींची तरतूद

    Spread the love

    Spread the love(रुपामाता फाऊंडेशनच्या मागणीला नगरपरिषदेचा सकारात्मक प्रतिसाद) धाराशिव  (प्रतिनिधी )शहरातील महिलांची सार्वजनिक स्वच्छतागृहांअभावी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी रुपामाता फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीला यश आले आहे. फाऊंडेशनचे सचिव अ‍ॅड.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *