दुर्गाष्टमीनिमित्त वैदिक होम-हवनाची पूर्णाहुती; श्री तुळजाभवानी देवीची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा संपन्न.

Spread the love

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज, सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमीनिमित्त मंदिर परिसरातील होमकुंडावर वैदिक होम-हवन विधी पार पडला. या यज्ञ कुंडामध्ये कोहळा व नारळ यांची पूर्णाहुती देऊन होम संपन्न झाला.

होमकुंडावरील वैदिक होम-हवन विधीचे यजमान जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार व त्यांच्या पत्नी सौमय्याश्री पुजार यांनी या विधीत सहभाग घेतला.

गणेश विहार येथे कोल्हापूर संस्थानच्या वतीने आयोजित होम-हवन विधीत प्रतिपचंद्र प्रयाग व मंदा प्रयाग हे यजमान म्हणून सहभागी झाले. तसेच, हैदराबादच्या रावबहादूर संस्थानच्या वतीने आयोजित होम-हवन विधीत कोंडो परिवारातील विनीत कोंडो व स्वप्नाली कोंडो यांनी यजमान म्हणून सहभाग घेतला.

यावेळी उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, रामेश्वर वाले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, उपाध्ये बंडू पाठक, अनंत कोंडो, रामचंद्र पाटील, पुजारी, सेवेकरी, भाविक तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दुर्गाष्टमीनिमित्त श्री तुळजाभवानी देवीची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. शारदीय नवरात्र महोत्सवातील दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीची ही विशेष अलंकार महापूजा मांडण्याची धार्मिक परंपरा आहे.

धार्मिक आख्यायिकेनुसार, महिषासुर नामक दैत्याने देवतांचा पराभव करून स्वर्गावर ताबा मिळविला होता. त्याच्या अत्याचारांपासून मुक्तता मिळविण्यासाठी देवतांनी आदिशक्तीची प्रार्थना केली. देवतांच्या तेजातून प्रकट झालेल्या जगदंबा मातेने महिषासुराशी घनघोर युद्ध करून त्याचा वध केला आणि देवतांसह समस्त सृष्टीला त्याच्या अत्याचारांतून मुक्त केले. देवीच्या या विजयाचे, तसेच तिच्या रौद्र, पराक्रमी आणि दुष्टांचा संहार करणाऱ्या स्वरूपाचे स्मरण म्हणून दुर्गाष्टमीच्या दिवशी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते.

दरम्यान, काल रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी देवींची अश्वारूढ छबिना मिरवणूक पारंपरिक धार्मिक पद्धतीने काढण्यात आली.

  • Related Posts

    शारदीय नवरात्र महोत्सव – २०२६

    Spread the love

    Spread the loveशारदीय नवरात्र महोत्सव – २०२६ श्री आई तुळजाभवानी मंदिरात घटोत्थापना,दि. २० ऑक्टोबर २०२६ तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील आज, मंगळवार, दिनांक २०…

    एस टी खाजगीकरणाचा विद्यार्थ्यांना भुर्दंड…

    Spread the love

    Spread the loveई-बसमध्येही विद्यार्थ्यांचे पास चालवा! आमदार कैलास पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी धाराशिव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसमधून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वैध शालेय पासच्या आधारे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *