
पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या चालक पोलीस शिपाई (25) पदांच्या भरती प्रकियेकरीता घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी मधून लेखी परिक्षेकरीता पात्र झालेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा दिनांक 05/04/2026 रोजी सकाळी 11.00 वाजता रामकृष्ण परमहंस, महाविद्यालय, तांबारी विभाग, धाराशिव येथे आयोजित करण्यात आली असून सदर परिक्षेचे प्रवेशपत्र महाआयटी विभागा कडून सर्व उमेदवारांना पाठविण्यात आले आहेत. दिनांक 05/04/2026 रोजी घेण्यात येणारी लेखी परिक्षा अत्यंत पारदर्शक पध्दतीने पार पाडण्याच्या दृष्टीने उमेदवारांना खालीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहे. उमेदवारांसाठी सुचना:-
- मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र व लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र असे दोन्ही प्रवेशपत्र तसेच प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेले पासपोर्ट साईज आकाराचे दोन फोटो असतील, तरच उमेदवारांस परिक्षा केंद्रात प्रवेश देण्यात यईल.
- उमेदवारांनी परिक्षा केंद्रावर परिक्षा सुरु होण्यापूर्वी चार तास अगोदर सकाळी 7.00 वाजता हजर रहावे.
- उमेदवारांना काळ्या शाईचे बॉलपेन या कार्यालयाकडून पुरविले जाणार आहेत. त्यामुळे सुचना क्र। मधील प्रवेशपत्र व पासपोर्ट फोटोव्यतिरिक्त इतर कोणत्याही साहित्य (उदा पेन, पेन्सिल, खोडरबर, मनगटी घड्याळ इ.) परीक्षा केंदावर नेण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे
- लेखी परिक्षा ही अत्यंत पारदर्शक पध्दतीने व सीसीटीव्ही कॅमेरे तसेच व्हिडीओ कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली होणार असून उमेदवारांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईन लक्ष ठेवण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रात भ्रमनध्वनी (मोबाईल)/ डिजीटल डायरी मायक्रोफोन/ मायक्रो कॅमेरा डिव्हाईस / कॅल्क्युलेटर डिजीटल नोट पॅड नोट्स पुस्तके ईअरफोन/ हिअरींग एड डिव्हाईस / स्मार्ट वॉचेस स्मार्ट आय ग्लासेस, इ तसेच इतर कुठलेही असे साहित्य, ज्याचा कॉपी करण्यासाठी उपयोग होईल अथवा उपयोग होऊ शकतो असे साहित्य आणण्यास सक्त मनाई आहे. तसे निदर्शनास आल्यास अथवा उमेदवार इतर कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करीत असल्याचे आढळून आल्यास त्यास त्याच क्षणी बाद ठरवून त्यांचेविरुध्द महाराष्ट्र स्पर्धा परिक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम 2024 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- लेखी परिक्षेच्या आदल्या दिवशी दिनांक 04/04/2026 रोजी बाहेरगावाहून येणाऱ्या उमेदवारांची राहण्याची व्यवस्था आर एस करिअर अकॅडमी, धाराशिव व बटालियन अकॅडमी, धाराशिव येथे करण्यात आली आहे

