खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व सोशल मीडियावर  खोटी बदनामी करण्याची पत्रकाराला धमकी.

Spread the love

बातमी डिलीट करण्यासाठी पत्रकार संदिप कोकाटे यांना धमकी

कळंब मध्ये दोघांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

NCMC कार्ड गैरव्यवहार प्रकरणात बातमी लावल्याचा राग

विश्व प्रशांत न्यूज/कळंब:- येथील पत्रकार संदिप कोकाटे यांना बातमी डिलीट करण्यासाठी दबाव टाकत धमकावणाऱ्या दोघांविरुद्ध बी. एन.एस व महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था ( हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियमाखाली शनिवार (ता. 04 ) रोजी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्यभरात सुरु असलेल्या NCMC म्हणजेच राष्ट्रीय सामान्य गतीशिलता कार्ड मध्ये मोठा गैरव्यवहार होत असल्याच्या घटना सुरु आहेत असाच प्रकार कळंब येथील आगारात सुरु होता येथे NCMC कार्ड काढण्यासाठी नागरिकांकडून शासनाने निश्चित केलेल्या शुल्का व्यतिरिक्त अधिकची रक्कम एजंट कडून वसुलली जात होती. या प्रकाराबाबत पत्रकार संदिप कोकाटे यांनी नमस्ते धाराशिव च्या समाजमाध्यमातून बातमी प्रसिद्ध केल्यानंतर सातत्याने संबंधित एजंट च्या आय डी वर सब एजंट म्हणून काम पाहणाऱ्या संगमेश मेनकुदळे व धीरज उर्फ लाला मालपाणी या दोघांकडून बातमी डिलीट करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आधी भावनिक नंतर आमिष दाखविण्यात आले मात्र पत्रकार संदिप कोकाटे यांनी या कोणत्याच गोष्टीला बळी न पडता याबाबत प्रशासन आणि याबाबतीतील आवाज उठवत राहिल्यानंतर त्यांना या दोघांनी गुरुवार (ता.02) रोजी रात्रीच्या 11 वाजता त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी जात धमक्या दिल्या व नंतर ही भेटण्याचा आग्रह करत पुन्हा चौकात बातमी डिलीट कर नाहीतर बघून घेण्याच्या आणि खोट्या गुन्हात अडकविण्याची व पैसे मागितले असल्याची बदनामी करण्याची दबाव टाकत धमकी दिल्याने पत्रकार संदिप कोकाटे यांना बातम्या डिलीट करण्यासाठी धमकविल्या प्रकरणी  कळंब पोलिस ठाण्यात संगमेश मेनकुदळे व धीरज उर्फ लाला मालपाणी या दोघांविरुद्ध बी. एन.एस चे कलम 351(2),3(5) व महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था ( हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम चे 3 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मला बातमी डिलीट करण्यासाठी संबंधित या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून दबाव व धमाकावले जात असून यांच्यापासून मला व माझ्या कुटुंबियांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच माझ्या प्रसार माध्यम संस्थेच्या व खासगी मालमत्तेची नुकसान करण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.संदिप कोकाटे (संपादक नमस्ते धाराशिव)

  • Related Posts

    व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला मोठे यश

    Spread the love

    Spread the loveपत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीचा प्रश्न अखेर मार्गी; परिवहन मंत्र्यांचे तातडीने आदेश मुंबई : अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून मिळणारी १०० टक्के मोफत प्रवासाची सवलत…

    पत्रकारितेच्या सक्षमीकरणाचा निर्धार; व्हॉईस ऑफ मीडिया च्या राष्ट्रीय अधिवेशनाची उत्साहात सांगता

    Spread the love

    Spread the loveपत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर नवी दिल्ली : देशभरातील पत्रकारांना एकाच व्यासपीठावर आणणारे, पत्रकारितेच्या वर्तमान आणि भविष्यातील दिशेचा वेध…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *