पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी धाराशिव जिल्हा प्रशासन सज्ज

Spread the love

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत मतदान साहित्याचे वितरण

धाराशिव – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या,२३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून,ही निवडणूक शांततेत, पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी धाराशिव जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये एकूण ७६ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, २९ हजार १४५ पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज २२ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले.

जिल्ह्यातील एकूण २९ हजार १४५ पदवीधर मतदारांमध्ये २२ हजार ७४५ पुरुष आणि ६ हजार ४०० महिला मतदारांचा समावेश आहे.पुरुष मतदारांचे प्रमाण ७८.०४ टक्के,तर महिला मतदारांचे प्रमाण २१.९६ टक्के आहे.जिल्ह्यातील उमरगा, धाराशिव आणि तुळजापूर या तीन तालुक्यांमध्ये मिळून १६ हजार ५३६ पदवीधर मतदार आहेत.
मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यामध्ये सर्वाधिक १६ मतदान केंद्रे धाराशिव तालुक्यात, तर सर्वांत कमी पाच मतदान केंद्रे वाशी तालुक्यात आहेत.उमरगा तालुक्यात १२,तुळजापूर तालुक्यात ११,कळंब तालुक्यात १०, भूम आणि परंडा तालुक्यांत प्रत्येकी आठ,तर लोहारा तालुक्यात सहा मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण ७६ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव तहसील कार्यालयात मतदानासाठी आवश्यक साहित्याची तपासणी करून ते संबंधित मतदान केंद्रांसाठी वितरित करण्यात आले. मतदान साहित्याच्या वितरणावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार उपस्थित होते.यावेळी निवडणूक उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके,तहसीलदार डॉ.मृणाल जाधव,निवडणूक नायब तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मतदान साहित्याचे वितरण हा निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असून,मतदान केंद्रांवर आवश्यक साहित्य वेळेत उपलब्ध होणे,त्याची योग्य तपासणी होणे आणि मतदान प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पडणे या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

लोकशाही व्यवस्थेत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. शिक्षण, रोजगार,कौशल्यविकास आणि पदवीधरांशी संबंधित विविध प्रश्नांना विधानपरिषदेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळवून देण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यामुळे प्रत्येक पात्र पदवीधर मतदाराने आपल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील ७६ मतदान केंद्रांवर उद्या मतदान होणार असून, त्यासाठी आवश्यक मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे.निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली असून,सर्व पात्र पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

  • Related Posts

    वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन थकले!

    Spread the love

    Spread the loveअत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी; वेतनातील तफावतीचेही आरोप धाराशिव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. दरमहा १५ तारखेला…

    एसटीच्या प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही; विभाग नियंत्रकांना प्रताप सरनाईकांचा इशारा!

    Spread the love

    Spread the loveमुंबई  – एसटी महामंडळाच्या मुख्यालयात प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेसंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांना थेट जबाबदार धरले जाईल, असा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *