दिवाळीच्या पार्श्वभमीवर धाराशिव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी – 80 लाखांचा गांजा जप्त, आंतरराज्य टोळी

Spread the love

धाराशिव – दीपावली सणाच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यामध्ये सतर्क राहून पेट्रोलिंग करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी दिले होते. या सूचनेनुसार धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तुळजापूर नळदूर्ग-उमरगा परिसरातील महामार्गावर पेट्रोलिंग करत होती
या दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांना एक वाहन अत्यंत भरधाव वेगाने संशयास्पद रितीने नळदुर्गच्या दिशेने जाताना दिसले.

पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला असता, चालकाने गाडी न थांबवता वेगाने पुढे पळवून नेली. त्यामुळे वाहनात काहीतरी संशयास्पद वस्तू असल्याचा संशाय बळावल सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार यांनी तात्काळ पुढे पेट्रोलिंग करत असलेले पोलीस हवालदार दयानंद गाडेकर यांना फोनवरून माहिती देऊन सदर गाडी थांबवण्यास सांगितले

पोलीस हवालदार गाडेकर यांनी तत्परता दाखवत सदर गाडी जळकोट येथील निरंजन हॉटेलच्या पुढे अडवली. चालकाकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांनी वाहनाचे मागील दार उघडून पाहिले असता, त्यात गांजासदृश्य अमली पदार्थ असल्याचा संशय आला. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. तसेच पुढील कायदेशीर कारवाईसाठी शासकीय पंच, फॉरेन्सिक व्हॅन आणि मुदेमाल वजन करणाऱ्या तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले.

शासकीय पंचांच्या समक्ष वाहनाची तपासणी केली असता, फॉरेन्सिक व्हॅनमधील तज्ज्ञांनी चाचणीअंती तो ‘गांजा’ असल्याचे निष्पन्न केले. जागेवरच मुद्देमालाचे वजन केले असता, एकूण 128 किलोग्रॅम गांजा आढळून आला. हा साठा व्यावसायिक प्रमाणातील (commercial Quantity) आहे. जप्त केलेला अमली पदार्थ आणि आयशर वाहन यांची एकूण किंमत 80 लाख 19 हजार रुपये आहे.

याप्रकरणी वाहन चालक आकाश दांगट आणि त्याचा सहकारी महादेव जाधव यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 15 नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. या गुन्ह्यात आंतरराज्य टोळी सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही पोलिसांनी हा मुदेमाल कोणाकड्डून आणला होता आणि तो पुढे कोणाला दिला जाणार होता, या दिशेने तपास सुरू केला आहे.

भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी डिसेंबर 2029 पर्यत भारतातून अमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्याचे उंद्देष्ट ठेवले असून, सर्व विभागांना युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्भूमीवर धाराशिव पोलिसांनी केलेली ही धडाकेबाज कामगिरी अत्यंत उल्लेखनीय मानली जात आहे.

याप्रकरणी नळदर्ग पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार दयानंद गाडेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५९/२०२६, कलम ८(क), २०(ब) ([)(क), २५, २९ एनडीपीएस (NDPS) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार करत आहेत.

सदर धडाकेबाज कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार दयानंद गाडेकर, पोलीस हवालदार फरहान पठाण, चालक पोलीस हवालदार सुभाष चौरे, नार्ईक पोलीस कॉन्स्टेबल अशोक ढगारे आणि चालक पोलीस शिपाई बाबा गुरव यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

  • Related Posts

    अग्नितांडव – येडशीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

    Spread the love

    Spread the loveदिवाळीच्या रात्री काळाचा घाला – किराणा दुकानासह वरच्या मजल्यावरील घर आगीत जळून खाक आई-वडील, पती-पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी अंत, गावावर शोककळा धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील येडशी…

    काळाचा घाला – एकाच कुटुंबातील 6 जणांचा होरपळून मृत्यू .

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे दिवाळीच्या सणादरम्यान काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास किराणा दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *