मराठवाडा पदवीधरचे नूतन आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा धाराशिव येथे भव्य नागरी सत्कार..!

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जल्लोष..!

धाराशिव -: मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील पदवीधरांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणारे नूतन आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात व कार्यकर्त्यांच्या गर्दीत हा सोहळा पार पडला.

पदवीधरांचे विविध प्रश्न, बेरोजगारी, उच्च शिक्षणातील अडचणी आणि सुशिक्षित तरुणांचे ज्वलंत प्रश्न विधिमंडळात प्रभावीपणे मांडण्यासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील कटिबद्ध राहतील, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. डॉ. पाटील यांच्या निवडीमुळे मराठवाड्यातील पदवीधरांना एक सुशिक्षित, संवेदनशील आणि आक्रमक आवाज मिळाला असल्याची भावना सत्कारादरम्यान व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मसूद शेख, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, शहराध्यक्ष अयाज उर्फ बबलू शेख, नगरसेवक खलिफा कुरेशी, नगरसेवक भोसले, नगरसेवक इस्माईल शेख, माजी नगरसेवक बाबा मुजावर, अफरोज पिरजादे, रणवीर इंगळे, युवक प्रदेश सचिव बागल,मझहर शेरीकर तसेच एड.योगेश सोन्ने पाटील , मिलिंद पेठे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या सत्कार सोहळ्यादरम्यान कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत डॉ. पाटील यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुशिक्षित तरुणांच्या हितासाठी संघटनात्मक ताकद नेहमीच सोबत राहील, असा निर्धार याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

  • Related Posts

    एन.व्ही.पी. शुगरकडून तिसऱ्या पंधरवाड्यातील शेतकऱ्यांना ५ कोटी ४९ लाखांचे ऊस बिल खात्यावर जमा!

    Spread the love

    Spread the loveपंधरा दिवसांत बिल अदा करण्याची परंपरा कायम; प्रतिटन ३,१०० रुपये दराने ऊस बिलाचे वितरण जागजी |(प्रतिनिधी) – एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि., जागजी कारखान्याने चालू तृतीय गळीत हंगाम २०२६-२७…

    ज्ञानज्योती फाउंडेशनच्या पुढाकारातून ५ वर्षीय चिमुकल्याची डोळ्यांची शस्त्रक्रिया मोफत; चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य!

    Spread the love

    Spread the loveउमरगा : समाजातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय उपचार मिळावेत, तसेच त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा, या सेवाभावी उद्देशाने ज्ञानज्योती फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने स्तुत्य सामाजिक उपक्रम…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *