श्रृंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन

Spread the love

तुळजापुर – श्रृंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांनी आज श्री क्षेत्र तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊन देवींची आरती केली.

यानंतर जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांची पाद्य पूजा केली. तसेच श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा, कवड्याची माळ, शाल व महावस्त्र भेट देत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान केला. श्रृंगेरी शारदा पीठ हे आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार प्रमुख पीठांपैकी पहिले ‘दक्षिणाम्नाय पीठ’ मानले जाते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर, नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक जया वाहणे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, रामेश्वर वाले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, सरकारी उपाध्ये बंडोपंत पाठक, नागेशशास्त्री अंबुलगे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, विपिन शिंदे, अनंत कोंडो यांच्यासह पुजारी तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    मजुरीला गेल्याशिवाय चूल पेटणार कशी ?’… ऐंशी वर्षांच्या अनुसयाबाईंच्या शब्दांनी पालकमंत्री गहिवरले !

    Spread the love

    Spread the loveदुष्काळाच्या वेदना जाणून घेण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक थेट शेताच्या बांधावर ; कष्टकरी महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची दिवाळी भेट ‘माझी आई आज असती, तर तीही तुमच्याच वयाची असती…

    नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सचिन तावडे यांचा कळंबमध्ये जंगी सत्कार; धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा निर्धार!

    Spread the love

    Spread the loveकळंब तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन; पक्षवाढीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन.. धाराशिव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी नवनियुक्त झाल्याबद्दल श्री. सचिन तावडे यांचा कळंब तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *