श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी बसवराज पुजारी यांची ५० हजार रुपयांची देणगी; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देणगीदाराचा सत्कार

Spread the love

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचे भक्त बसवराज पुजारी, रा. घानपूर, ता. चिंचोली, जि. कलबुर्गी (कर्नाटक) यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी ५० हजार रुपयांची देणगी अर्पण केली.

बसवराज पुजारी हे आपल्या कुटुंबासह श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी तुळजापुरात आले होते. यावेळी त्यांनी देवीच्या चरणी ५० हजार रुपयांची देणगी अर्पण केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते बसवराज पुजारी यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र भेट देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर, उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    निवडणूक आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही,याची दक्षता घ्या,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    Spread the love

    Spread the loveनोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याचे निर्देश धाराशिव – भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,येत्या २३ ऑक्टोबर रोजी…

    शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी पूर्वी पाच हजार रुपये जमा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    Spread the love

    Spread the loveआणखी चाळीस तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश, परीक्षा शुल्क सरसकट माफ होणार पिण्याचे पाणी, चाऱ्याची उपलब्धतेबाबत नियोजन; शेतकऱ्यांकडून वसूली नको – बँकांना निर्देश मुंबई -: राज्यातील आणखी चाळीस तालुके…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *