दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावतीने ‘आनंदाचा शिधा’ वाटप

Spread the love

धाराशिव : दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने ‘आनंदाचा शिधा’ वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता धाराशिव येथील बायपास रोडवरील श्री गणेश मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाची भर पडावी, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे धाराशिव लोकसभा सह-संपर्कप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके यांनी केले आहे.

  • Related Posts

    एन.व्ही.पी. शुगरकडून तिसऱ्या पंधरवाड्यातील शेतकऱ्यांना ५ कोटी ४९ लाखांचे ऊस बिल खात्यावर जमा!

    Spread the love

    Spread the loveपंधरा दिवसांत बिल अदा करण्याची परंपरा कायम; प्रतिटन ३,१०० रुपये दराने ऊस बिलाचे वितरण जागजी |(प्रतिनिधी) – एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि., जागजी कारखान्याने चालू तृतीय गळीत हंगाम २०२६-२७…

    ज्ञानज्योती फाउंडेशनच्या पुढाकारातून ५ वर्षीय चिमुकल्याची डोळ्यांची शस्त्रक्रिया मोफत; चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य!

    Spread the love

    Spread the loveउमरगा : समाजातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय उपचार मिळावेत, तसेच त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा, या सेवाभावी उद्देशाने ज्ञानज्योती फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने स्तुत्य सामाजिक उपक्रम…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *