एसटीच्या प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही; विभाग नियंत्रकांना प्रताप सरनाईकांचा इशारा!

Spread the love

मुंबई  – एसटी महामंडळाच्या मुख्यालयात प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेसंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांना थेट जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशारा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. या बैठकीला महामंडळाचे सर्व विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक उपस्थित होते.

सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ, निरोगी आणि आरोग्यदायी प्रसाधनगृहे उपलब्ध करून देणे ही एसटी महामंडळाची मूलभूत जबाबदारी आहे. स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

दोन रुपये स्वच्छता अधिभार, मग सुविधा स्वच्छच हव्यात!
एसटी महामंडळाकडून प्रवाशांकडून दोन रुपये स्वच्छता अधिभार आकारला जातो. ही रक्कम देताना प्रवासीही हरकत घेत नाहीत. मात्र, त्याबदल्यात त्यांना किमान स्वच्छतेच्या सुविधा मिळणे अपेक्षित आहे. प्रवाशांच्या या रास्त अपेक्षा पूर्ण करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे अस्वच्छ असल्यास त्याचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या प्रतिमेवर होतो. त्यामुळे स्वच्छतेच्या कामात कोणतीही कुचराई होता कामा नये, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.

कंत्राटदारांसोबत अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित
बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची नियमित तपासणी करावी, स्वच्छतेबाबत सातत्याने दक्ष राहावे आणि संबंधित कंत्राटदार संस्थांकडून करारानुसार स्वच्छता करून घ्यावी, असे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. केवळ कंत्राटदारांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, तर आपल्या कार्यक्षेत्रातील स्वच्छतेवर संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असेही मंत्री सरनाईक यांनी अधोरेखित केले.

प्रवाशांना स्वच्छ सुविधा देण्यात प्रशासन कमी पडल्यास संबंधित विभाग नियंत्रकांची जबाबदारी निश्चित केली जाईल, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
एसटी ही सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे सुरक्षित आणि सुखकर प्रवासासोबतच स्वच्छ बसस्थानके व आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित या विषयाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून स्वच्छतेच्या बाबतीत अधिक संवेदनशीलता दाखवावी, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.

  • Related Posts

    वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन थकले!

    Spread the love

    Spread the loveअत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी; वेतनातील तफावतीचेही आरोप धाराशिव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. दरमहा १५ तारखेला…

    पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी धाराशिव जिल्हा प्रशासन सज्ज

    Spread the love

    Spread the loveजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत मतदान साहित्याचे वितरण धाराशिव – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या,२३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून,ही निवडणूक शांततेत, पारदर्शक आणि सुरळीत पार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *