पाण्याचा वापर काटकसरीने करा; सण-उत्सवांच्या काळात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा – सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांचे आवाहन..

Spread the love

धाराशिव : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याची बचत करणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पाणी व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन आणि जनजागृती यावर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे. सध्या विविध ठिकाणी सण-उत्सवांचे आयोजन होत असून, या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी आयोजकांनी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी केले आहे.पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन असून,त्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आज आपण पाण्याचा वापर जपून केला नाही, तर भविष्यात पाण्याच्या टंचाईची तीव्रता वाढल्यानंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते.त्यामुळे घरगुती वापरापासून सार्वजनिक कार्यक्रमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी पाणी बचतीची सवय अंगीकारली पाहिजे.नळ सुरू ठेवणे, पिण्याचे पाणी विनाकारण वाया घालवणे आणि पाण्याचे योग्य नियोजन न करणे या बाबी टाळल्या पाहिजेत.पाणी बचतीचा संदेश केवळ कागदावर न राहता तो प्रत्येकाच्या कृतीत उतरला पाहिजे.
गेल्या काही वर्षांतील पावसाचे प्रमाण आणि त्यातील चढ-उतार लक्षात घेता, पावसाचे पाणी साठवणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असला, तरी पावसाच्या पाण्याचा पुरेसा साठा, पुनर्वापर आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन झाले नाही, तर त्याचा अपेक्षित फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळू शकत नाही. त्यामुळे जलसंधारण, पाणी साठवण आणि पाणी वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनीही एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाची गरज अधोरेखित राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाच्या अनुषंगाने पर्यावरणीय परिणाम, पाण्याचे न्याय्य वाटप, स्थानिक गरजा आणि तांत्रिक व्यवहार्यता यांचा विचार करून प्रभावी धोरण राबविणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कृष्णा–सीना प्रकल्पाची कामे प्राधान्याने पूर्ण करून मराठवाड्याला हक्काचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही गणेश रानबा वाघमारे यांनी केली. सण,उत्सवांत पाण्याचा अपव्यय टाळा
सण-उत्सव,धार्मिक कार्यक्रम,मिरवणुका आणि सार्वजनिक समारंभांच्या वेळी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे. पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देताना त्याचा अपव्यय होणार नाही, याचीही दक्षता आयोजकांनी घ्यावी. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, पावसाचे पाणी साठवावे, जलस्रोत स्वच्छ ठेवावेत आणि पाणी बचतीच्या मोहिमेत सहभागी व्हावे.
पाणी हा केवळ आजचा प्रश्न नसून भावी पिढ्यांच्या अस्तित्वाशी निगडित विषय आहे. त्यामुळे शासन, प्रशासन, सामाजिक संस्था,सार्वजनिक मंडळे आणि नागरिक यांनी एकत्र येऊन पाणी बचत व जलसंवर्धनाची लोकचळवळ उभी करावी.पाणी जपा,पाणी वाचवा आणि पाणी काटकसरीने वापरा,हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी केले आहे.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी बसवराज पुजारी यांची ५० हजार रुपयांची देणगी; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देणगीदाराचा सत्कार

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचे भक्त बसवराज पुजारी, रा. घानपूर, ता. चिंचोली, जि. कलबुर्गी (कर्नाटक) यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी ५० हजार रुपयांची देणगी अर्पण…

    निवडणूक आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही,याची दक्षता घ्या,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    Spread the love

    Spread the loveनोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याचे निर्देश धाराशिव – भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,येत्या २३ ऑक्टोबर रोजी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *