
चोराखळी,बारूळ येथे फराळासोबत घोंगडी बैठक; येडशीजवळ आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी

धाराशिव – जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी चोराखळी व बारुळ येथे दिवाळी फराळासोबत घोंगडी बैठक घेतली. तसेच सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येडशीजवळ आदिवासी बांधवांच्या पालावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.

घोंगडी बैठकीत शेतकरी,युवक,वडीलधारी मंडळी आणि तरुणांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. दिवाळी फराळाचा आस्वाद घेताना शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी, अपेक्षा आणि प्रश्न मांडले. हा संवाद केवळ सणापुरता मर्यादित नसून संकटाच्या काळात शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास देणारा असल्याचे पाटील यांनी सांगितले. दुष्काळावर मात करण्यासाठी आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्यात अनेक ठोस प्रयत्न सुरू आहेत. उजनीतून धाराशिवसाठी एक टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे. गावागावांत नोडल अधिकारी नियुक्त केले असून चारा लागवड आणि गाळपेर क्षेत्रातील शेतीला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संकटात शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. त्यांच्या सुख-दुःखात आणि संघर्षात आपण खंबीरपणे सोबत आहोत, अशी ग्वाहीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी दिली.

दरम्यान, येडशीजवळील आदिवासी बांधवांच्या पालावर भेट देऊन आमदार पाटील यांनी चिमुकल्या मुलांसह कष्टकरी कुटुंबीयांबरोबर दिवाळी फराळाचा आनंद घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आपुलकीतून दिवाळीचा खरा आनंद अनुभवायला मिळाला, असे त्यांनी सांगितले. दिवाळीचा खरा आनंद केवळ रोषणाईत नसून माणसांच्या चेहऱ्यावरील समाधानात आणि परस्परांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यात आहे, अशी भावना व्यक्त करत या जिल्ह्यातील सर्व सहकारी बांधवांनी अशाच उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

यावेळी चोराखळी येथे विकास बारकुल,गणेश बारकुल, खंडेराव मैदाड,पोपट जेवे,शिवाजी बाराते,रामकिसन कोकाटे,मदन बारकुल ,स्वप्निल दिवाने,रणजित दिवाने विश्वंभर मैंदाड,बाबू भाई बारुळ येथे सिध्देश्वर कोरे,विक्रम देशमुख ,संतोष बोबडे, दयानंद शिंदे,वैभव मरडे,किसन देडे,भिवाजी इंगोले,प्रभाकर मुळे,अनिल बंडगर,प्रशांत लोमटे,बाबुराव ठोंबरे, शहाजी सुपनार, नबीलाल शेख, संजय ठोंबरे, सुधीर सुपनर, पंकज धनवडे, भास्कर सगट, रतन मुदगुडे, बाबुराव यावलकर, बाबुराव टोम्पे, अशोक देवगुंडे, पद्मराज गडदे, दामाजी राठोड, कल्याण बिराजदार

येडशी येथे संजय लोखंडे,विजय सस्ते,डॉ,प्रशांत पवार,शशांक सस्ते,जयंत भोसले,सुनील शेळके उपस्थित होते.