
तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री आई तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र महोत्सवास कालपासून सुरुवात झाली असून,या कालावधीत देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक तुळजापुरात येत आहेत.या पार्श्वभूमीवर रस्ते अपघातातील जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदतीसाठी पुढाकार घेता यावा, यासाठी ‘गुड समॅरिटन’ (Good Samaritan) ॲपचा वापर करावा,असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.
रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता मदत करणाऱ्या नागरिकाला ‘गुड समॅरिटन’ असे म्हणतात. अपघातानंतर जखमी व्यक्तीला शक्य तितक्या लवकर वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते.अपघातानंतरचा पहिला तास हा ‘गोल्डन अवर’ म्हणून ओळखला जातो.या कालावधीत योग्य वैद्यकीय मदत मिळाल्यास जखमी व्यक्तीचे प्राण वाचण्याची शक्यता वाढते.त्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी नागरिकांनी संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने पुढाकार घ्यावा.
‘गुड समॅरिटन’ ॲपच्या माध्यमातून उपलब्ध सुविधांनुसार अपघाताची माहिती देणे, छायाचित्रे अपलोड करणे तसेच संबंधित यंत्रणांशी संपर्क साधणे शक्य होऊ शकते. भाविकांनी गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आवश्यक असलेल्या परवानग्या, लोकेशन सेटिंग्ज आणि संपर्क सुविधांची तपासणी करून घ्यावी. ॲपचा वापर करताना त्यामधील सूचनांचे पालन करावे.
अपघात किंवा अन्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका सेवेसाठी १०८ या टोल फ्री क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा.अपघातग्रस्तांना मदत करताना स्वतःची सुरक्षितता जपावी आणि जखमी व्यक्तीला लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
‘गुड समॅरिटन’ ॲप संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क
‘गुड समॅरिटन’ ॲपवर आयडी (ID) तयार करण्यासाठी किंवा यासंदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी तुळजापूर ईआर.सी.(ERC) टीमच्या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा,असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.
1) तुळजापूर ई.आर.सी. डेस्क (अधिकृत) – 9766037164
2) अमेश वाय. कांबळे (ऑपरेशन्स डेस्क) – 9766036985
3) नवीन यू. येरेकर (टीम लीडर) – 9096198867
4) विशाल व्ही. जाधव (ई.आर.ओ.) – 9767382690
5) प्रीतील एल. पवार (ई.आर.ओ.) – 7058361289
6) भूषण एच. पवार (ई.आर.ओ.) – 7219183390
7) स्वप्निल एस. क्षीरसागर (ई.आर.ओ.) – 7620753884
यांच्याशी संपर्क साधावा.