LCB चा पुन्हा धमाका पवनचक्की तार चोरीचा पर्दाफाश एकुण ११,५३,००० रु.चा मुद्देमाल जप्त.”

Spread the love

धाराशिव -: पोलीस अधिक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शना खाली दि. 05/10/2026 रोजी स्थागुशाचे पथक मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पथकास गोपनिय माहिती मिळाली की, मांडवा शिवारात शाम अजिनाथ शिंदे व त्याचे साथीदारांनी येरमाळा, वाशी परिसरातील पवनचक्कीचे अनेक ठिकाणाहुन नवीन विदयुतवाहीनीची अॅल्युमिनीयम तार चोरून आणलेली असुन ती एका पिकपमध्ये भरत आहेत अशी माहिती मिळाल्याने पथक लागलीच माहिती मिळालेल्या ठिकाणी सोबतचे पोलीस स्टाफसह गेले असता पथकास तेथे एक पिकअप व दोन मोटारसायकली उभ्या असलेल्या दिसल्या व त्या पिकपमध्ये 8 ते 10 इसम ताराचे बंडल टाकत असल्याचे दिसले. पथकातील पोलीस स्टाफ अतिशय सावधगिरीने पायी चालत जात असताना पोलीसांना पाहुन ते इसम पळुन जात असताना पथकाने त्यापैकी 05 इसमांना पाठलाग करून अतिशय शिताफीने पकडुन ताब्यात घेवुन त्यांचे नाव गावाबाबत विचारले त्यांनी त्यांचे नाव 1) शाम अजिनाथ शिंदे वय 26 वर्षे रा. मांडवा 2 ) लाला गोविंद पवार वय 24 वर्षे रा. जुनी दुध डेअरी , धाराशिव ह.मु. मांडवा 3) आकाश श्रीरंग पवार रा. वरूडा ता. जि. धाराशिव 4) पवन कालीदास काळे वय 22 वर्षे रा. वरूडा ता. जि. धाराशिव व पिकप चालक अंगद प्रल्हाद शिंदे वय 32 वर्षे रा.घोसापुरी ता. जि. बीड असे सांगीतले तसेच त्या ठिकाणाहुन 04 पळुन गेलेल्या इसमांचे पण नावे सांगीतले. नमुद ठिकाणी असलेल्या ताराबद्दल विचारले असता त्या ताराचे बंडल हे तेरखेडा, इंदापुर, ढोकी शिवारातुन पवनचक्कीचे नवीन पोलवरील लाईन कट करून तारा चोरून आणलेल्या आहेत असे सांगीतले. आरोपीकडे आणखी चोरीचे ताराबद्दल विचारले असता त्यापैकी आकाश श्रीरंग पवार याने सांगीतले की, धाराशिव येथील जाकेर निजाम शेख यास भरपुर तारा विकलेल्या आहेत असे सांगीतले. त्यावरून पथकाने धाराशिव येथे येवुन जाकेर निजाम शेख याचा शोध घेवुन त्यास पकडुन त्याचेकडे चोरीचे ताराबद्दल विचारले असता जाकेर शेख याने आरोपीकडुन चोरीच्या तारा घेतल्या असल्याचे सांगीतले. नमुद आरोपी व चोरीच्या तारा घेणार यांना पोस्टे येरमाळा येथे हजर करून 04 गुन्हे उघडकीस आणुन त्यांचेकडुन तांब्याची तार, अॅल्युमिनियम तार, पिकअप, व दोन मोटारसायकल असा एकुण 11,53,000 रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे. यापैकी शाम अजिनाथ शिंदे हा पोस्टे नळदुर्ग येथील दरोड्याचे गुन्हयात फरार आरोपी आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, पोलीस हवालदार/ विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, क्युआरटी पथकातील आदित्य बालवाड, रितेश चारले, महेश खरात चापोह / महेबुब अरब, सुभाष चौरे, रोहित दंडनाईक, प्रकाश बोईनवाड यांचे पथकाने केली आहे.

  • Related Posts

    पदवीधरच्या मैदानातून ५४ उमेदवारांचे अर्ज वैध , ८ अर्ज बाद

    Spread the love

    Spread the loveछत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या अर्जांची बुधवारी (दि. ७ ऑक्टोबर) छाननी करण्यात आली. या छाननी प्रक्रियेत दाखल झालेल्या एकूण ६२ उमेदवारी अर्जांपैकी ८ अर्ज…

    दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार : सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावेजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे आवाहन ; ८ ऑक्टोबरला बैठक

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजनांना गती दिली आहे.या प्रयत्नांना सेवाभावी संस्था,व्यक्ती आणि महाविद्यालयांची साथ मिळाल्यास दुष्काळाशी अधिक प्रभावीपणे सामना…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *