शारदीय नवरात्र महोत्सव – २०२६
श्री आई तुळजाभवानी मंदिरात घटोत्थापना,दि. २० ऑक्टोबर २०२६

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील आज, मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर रोजी नवमीच्या दिवशी घट उठविण्यात आले. दिनांक ११ ऑक्टोबर रोजी मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली होती. नवरात्र महोत्सवाच्या नऊ दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक विधी, होम-हवन व पूजाअर्चा पार पडल्या.


आज नवमीच्या दिवशी श्री तुळजाभवानी मंदिरात घट उठविण्याचा धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, रामेश्वर वाले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, पुजारी, सेवेकरी तसेच भाविक उपस्थित होते.