
नळदुर्ग — धाराशिव राष्ट्रसेवा दलाच्या वतीने शनिवारी व रविवार (दिनांक 17/18) रोजी नळदुर्ग येथील आपलं घर बाल ग्रहात दोन दिवसीय ध्यान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. शिबिरात प्रथम ते दहावीपर्यंतच्या विविध वयोगटातील मुलं-मुलींची सक्रिय सहभागी होते . या शिबिराचे उद्दिष्ट मुलांमध्ये मानसिक शांती, एकाग्रता व नैतिक मूल्यांचा विकास करणे हे होते

शिबिराचे उद्घाटन धाराशिव राष्ट्रसेवा दलाच्या स्थानिक पदाधिकारी निजगुण स्वामी,भैरवनाथ कानडे, दयानंद हाके,अजय वाघाळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात सहा ते सोळा वयोगटातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्साहाने उपस्थित होते.
दैनंदिन कार्यक्रम व कृती
ध्यान आणि श्वासोच्छ्वास तंत्र: मुलांना प्राथमिक ध्यान पद्धती व श्वास नियंत्रित कसरती शिकवण्यात आल्या.
योगासने व शरीरस्नायूंची शिस्त: साध्या योगासने आणि शरीरस्नायूंना ताण-रिलीज देणाऱ्या व्यायामांचे प्रशिक्षण दिले गेले.
श्री श्री रविशंकर यांच्या आवाजातील सरल ध्यान व अपनी मुस्कान को खिलना या ध्यानक्रिया घेण्यात आल्या कार्यक्रमाचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रमाने घेण्यात आला, खरा तो एकची धर्म या गीताने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली या कार्यक्रमासाठी राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजय वाघाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.. या कार्यक्रमासाठी बालगृहाचे अधीक्षक संदीप चवले, कानडे आप्पा गृहमता…..
उमाताई, कानडे ताई, फडणीस ताई अर्चनाताई अवचार ताई
.व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले..