मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमजिल्ह्याची ऐतिहासिक झेप : १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण

Spread the love

धाराशिव – जिल्हा उद्योग केंद्राने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या महत्त्वाकांक्षी योजनेत १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.हे यश जिल्हाधिकारी यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे शक्य झाल्याचे जिल्हा उद्योग केंद्राकडून सांगण्यात आले.या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत उद्योजकतेला चालना देण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी घेतलेल्या आढावा बैठका,नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि प्रशासनातील समन्वय यामुळे संपूर्ण यंत्रणेला नवी दिशा मिळाली.विशेषतः प्रलंबित प्रकरणांच्या जलद मंजुरीसाठी बँक अधिकाऱ्यांसमवेत घेण्यात आलेल्या बैठका आणि दिलेले स्पष्ट निर्देश यामुळे कर्जमंजुरी प्रक्रियेतील अडथळे दूर झाले.परिणामी,अनेक प्रस्तावांना वेळेत मंजुरी मिळून लाभार्थ्यांना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळाले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना केवळ कर्जपुरवठ्यापुरती मर्यादित नसून,ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देणारी एक प्रभावी संधी आहे.या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती वाढून आर्थिक विकासाला गती मिळत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतिशील व संवेदनशील दृष्टिकोनामुळे जिल्ह्यातील शेकडो होतकरू युवक-युवतींच्या उद्योजक होण्याच्या स्वप्नांना बळ मिळाले असून, रोजगार निर्मिती क्षेत्रात जिल्ह्याने नवा आदर्श निर्माण केला आहे.
या यशाबद्दल जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.


  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *