
रविराज साबळेंना पदवीधर मतदार स्वीकारणार का? संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाणांसमोर आव्हान!
छत्रपती संभाजीनगर – शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे रविराज साबळे आता पदवीधरांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणार का? संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

एकीकडे महायुतीचे तीन वेळा आमदार राहिलेले सतीश चव्हाण यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व समोर असताना, रविराज साबळे पदवीधर मतदारांचा विश्वास संपादन करण्यात कितपत यशस्वी होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे साबळे आता बेरोजगारी, शिक्षण, नोकरीच्या संधी आणि पदवीधरांच्या प्रलंबित प्रश्नांना किती प्रभावीपणे वाचा फोडणार, याकडे मतदारांचे लक्ष असेल.
अनुभवी नेतृत्वाला पुन्हा संधी मिळणार की नव्या चेहऱ्याला पदवीधर पसंती देणार? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील लढा पदवीधरांच्या मतांमध्ये रूपांतरित करण्यात रविराज साबळे यशस्वी होणार का, हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल.