दुष्काळाच्या झळांमध्ये ६०० गरजू महिलांची दिवाळी गोड; खासदार ओमराजेंचा मदतीचा हात!

Spread the love

प्रभाग क्रमांक ४ मध्ये दिवाळी शिधा किटचे वाटप; शिवसेना नेते प्रशांत (बापू) साळुंके यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय

धाराशिव : दुष्काळाच्या झळांनी सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना गोरगरीब कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाचा गोडवा निर्माण करण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या माध्यमातून धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील तब्बल ६०० गरजू महिलांना दिवाळी शिधा किटचे वाटप करण्यात आले. शिवसेना नेते प्रशांत साळुंके यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.
यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक गरीब व वंचित कुटुंबांसमोर दिवाळीचा सण साजरा करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. घरातील आर्थिक अडचणींमुळे सणाचा आनंद मर्यादित राहू नये, या भावनेतून प्रभागातील गरजू महिलांना दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्याचे किट वितरित करण्यात आले. या किटमध्ये बेसन, साखर, रवा, मैदा, पोहे आणि तेल यांसह आवश्यक साहित्याचा समावेश होता.यावेळी शिवसेना नेते प्रशांत (बापू) साळुंके यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, प्रभाग क्रमांक ४ मधील अनेक गोरगरीब आणि खऱ्या अर्थाने गरजू कुटुंबे आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. दुष्काळामुळे त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. अशा परिस्थितीत या कुटुंबांची दिवाळी अंधारात जाऊ नये, त्यांच्याही घरात सणाचा आनंद फुलावा, या उद्देशाने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या माध्यमातून ६०० गरजू महिलांना दिवाळी शिधा किट उपलब्ध करून देण्यात आले.

गरिबांच्या दिवाळीत आनंदाचा क्षण निर्माण व्हावा!
प्रभागातील नागरिकांना अनेक मूलभूत सुविधांसह आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत गरजू कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे ही सामाजिक बांधिलकी आहे. गरिबांच्या दिवाळीत फुलाची पाकळी म्हणून का होईना, आनंदाचा क्षण निर्माण व्हावा, याच भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे साळुंके यांनी सांगितले.दुष्काळाच्या संकटातही गरजू कुटुंबांचा विचार करून त्यांच्या सणाचा आनंद वाढविण्यासाठी मदतीचा हात दिल्याबद्दल त्यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे आभार मानले. प्रभागातील नागरिकांच्या वतीनेही त्यांनी खासदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.दुष्काळाच्या झळा, आर्थिक विवंचना आणि संकटांची मालिका सुरू असतानाही सामाजिक बांधिलकी जपत गरजू महिलांच्या घरापर्यंत दिवाळीचा गोडवा पोहोचविणारा हा उपक्रम प्रभाग क्रमांक ४ मध्ये समाधान आणि माणुसकीचा संदेश देणारा ठरला.

  • Related Posts

    दिवाळीच्या पार्श्वभमीवर धाराशिव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी – 80 लाखांचा गांजा जप्त, आंतरराज्य टोळी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – दीपावली सणाच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यामध्ये सतर्क राहून पेट्रोलिंग करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी दिले होते. या सूचनेनुसार धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तुळजापूर…

    अग्नितांडव – येडशीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

    Spread the love

    Spread the loveदिवाळीच्या रात्री काळाचा घाला – किराणा दुकानासह वरच्या मजल्यावरील घर आगीत जळून खाक आई-वडील, पती-पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी अंत, गावावर शोककळा धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील येडशी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *