शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध — आ. डॉ. प्रतापसिंह पाटील

Spread the love

जायकवाडीतून चार पाणी आवर्तने मंजूर; ५ नोव्हेंबरपासून पहिले आवर्तन!

धाराशिव (प्रतिनिधी) : जायकवाडी धरणातून रब्बी हंगामासाठी तीन आणि उन्हाळी हंगामासाठी एक, अशी एकूण चार पाणी आवर्तने मंजूर करण्यात आली असून, पहिले आवर्तन ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ.प्रतापसिंह पाटील उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना वेळेवर पाणी मिळावे, कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचावे आणि पाणीवाटपात कोणत्याही भागावर अन्याय होऊ नये, यासाठी प्रभावी नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
माजी मंत्री आ.राजेश टोपे यांच्या सह डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी पाच पाणी आवर्तने देण्याची मागणी लावून धरली असून, सध्या चार आवर्तने मंजूर झाली आहेत. जानेवारी महिन्यात पाणीसाठ्याचा फेरआढावा घेतल्यानंतर पाचव्या आवर्तनासाठीही शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
“शेतकऱ्यांच्या प्रश्नाला पक्षीय राजकारणाची किनार न देता त्यांच्या हक्काचे पाणी शेतापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. मंजूर आवर्तनांची प्रभावी अंमलबजावणी आणि अतिरिक्त आवर्तनासाठी आमचे प्रयत्न कायम राहतील,”अशी भूमिका आ. डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी बैठकीत व्यक्त केली.
या बैठकीस लोकसभा सदस्य,विधानसभा सदस्य व विधान परिषद सदस्य यांच्यासह इतर समिती सदस्य व जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  • Related Posts

    श्रृंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन

    Spread the love

    Spread the loveतुळजापुर – श्रृंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांनी आज श्री क्षेत्र तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊन देवींची…

    मजुरीला गेल्याशिवाय चूल पेटणार कशी ?’… ऐंशी वर्षांच्या अनुसयाबाईंच्या शब्दांनी पालकमंत्री गहिवरले !

    Spread the love

    Spread the loveदुष्काळाच्या वेदना जाणून घेण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक थेट शेताच्या बांधावर ; कष्टकरी महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची दिवाळी भेट ‘माझी आई आज असती, तर तीही तुमच्याच वयाची असती…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *