” नशा मुक्त युवा ” थीम अंतर्गत (NYLP) युवा संसद कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

भूम :- दि.24.10 2025 रोजी भूम येथे मेरा युवा भारत कार्यालय,धाराशिव व स्वामी विवेकानंद क्लासेस शिवाजी नगर, भूम ता.भूम जि.धाराशिव यांचे वतीने “नशा मुक्त युवा” कार्यक्रम थीम अंतर्गत पडोस युवा संसद कार्यक्रम मेरा युवा भारत कार्यालयाचे जिल्हा युवा अधिकारी श्री.प्रतिक करंजकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. या वेळी माय भारत कार्यालयाचे कार्यक्रम सहाय्यक श्री.रविकांत सुरवसे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व माय भारत पोर्टल विषयी थोडक्यात माहिती विषद केली.
या प्रसंगी राज्य परिवहन विभाग,धाराशिव सहाय्यक वाहतूक अधिक्षक मा.श्रीकांत सुरवसे सर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव (पी.एल.व्ही.) अधिकार मित्र श्री.प्रशांत मते व सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील गरड-पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तसेच सदरील कार्यक्रमांमध्ये श्री.कृष्णकुमार चौरे यांनी व्यसनाची कारणे, प्रकार, शारीरिक/मानसिक आरोग्य, कुटुंब व समाजावरील परिणाम आणि विकसित भारतावरील परिणाम यावर ज्ञान प्रसार.
प्रा.सोमनाथ गुंजाळ यांनी MY Bharat पोर्टल आणि त्याचे फायदे याबाबत समर्पित सत्र. उद्दिष्टे, वैशिष्ट्ये व संधी यांचा आढावा.
प्रा. प्रशांत सूर्यवंशी यांनी व्यसनमुक्त युवा व नशा मुक्त भारत घडविण्यात युवकांची भूमिका यावर संवादात्मक सत्र. प्रतिज्ञा, गटचर्चा, केस स्टडी, प्रश्नमंजुषा, भूमिका-अभिनय इत्यादी उपक्रम.
श्री.आत्माराम पंडीत यांनी व्यसनाचे परिणाम, पुनर्प्राप्तीचे प्रवास व समुदाय पुढाकार यावर लघुपट / माहितीपट प्रदर्शन व चर्चा या विषयावर विचार व्यक्त केले.
वरील विविध विभागाच्या चार
मान्यवरांनी मोलाचे अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमाची सांगता “नशा मुक्त युवा” शपथ घेऊन करण्यात आली.
तसेच माय भारत केंद्राचे माजी तालुका समन्वयक श्री.घनश्याम वाघमारे यांनी आभार व्यक्त केले व कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.