धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने स्वच्छता अभियान

Spread the love

धाराशिव :- बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौध्द धम्माची दिक्षा घेतली,या ऐतिहासिक अशा घटनेला उद्या दि १४ ऑक्टोबर रोजी ७० वर्षं पुर्ण होताहेत,या ७० व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेतील बाबी पाहता नगर परिषद स्वच्छता विभाग व फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले,बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस वंदन करण्यासाठी बौध्द भीम अनुयायी यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवुन महामानवाला अभिवादन केले जाते, यावेळी समितीचे अध्यक्ष गणेश रानबा वाघमारे, सचिव प्रवीण जगताप, सदस्य अतुल लष्करे,श्रीकांत मटकिवाले सह इतर व नगर परिषदचे कर्मचारी उपस्थित होते,नगर परिषद धाराशिव सफाई विभागातील अधिकारी कर्मचारी व कामगार यांचे आभार गणेश वाघमारे यांनी मानले.

  • Related Posts

    शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्यासह पशुधनाच्या चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन यावर भर

    Spread the love

    Spread the love-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई  – राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील सहा ते आठ महिने अधिक आधार देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी…

    श्री आई तुळजाभवानी देवींची नित्योपचार पूजा (तिसरी माळ)

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – श्री आई तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज मंगळवार १३ ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी देवींची नित्योपचार पूजा संपन्न झाली.शारदीय नवरात्रीतील आजची तिसरी माळ आहे. काल सोमवारी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *