श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक भेंडोळी उत्सव उत्साहात संपन्न

Spread the love

तुळजापूर – श्री क्षेत्र तुळजापूर येथे दीपावलीतील काळभैरवनाथांचा पारंपरिक भेंडोळी उत्सव रविवारी रात्री मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. काशी आणि तुळजापूर येथे साजरा होणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवाला प्राचीन धार्मिक परंपरेची पार्श्वभूमी लाभली आहे.

उत्सवानिमित्त श्री काळभैरव मंदिरासमोर पारंपरिक पद्धतीने भेंडोळीची बांधणी करून विधिवत पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर भेंडोळी प्रज्वलित करण्यात आली. शेकडो पुजारी बांधवांनी पेटती भेंडोळी खांद्यावर घेऊन श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिराकडे प्रस्थान केले. आगीच्या ज्वालासह एका छोट्याशा रस्त्यातून भेंडोळी घेऊन देवीच्या मंदिरात जाणं हा एक थरारक अनुभव असतो. यावेळी ‘आई राजा उदो उदो’ आणि ‘भैरवनाथ चांगभलं’ या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला.

रात्री साडेआठच्या सुमारास भेंडोळी मंदिरात दाखल झाली. यावेळी भेंडोळीची गाभाऱ्यात जाऊन प्रदक्षिणा झाली.
भेंडोळी मंदिराबाहेर पडताच अभिषेक घाट झाली. व सिंहासन व अभिषेकास प्रारंभ झाला. या वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

या वेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, रामेश्वर वाले, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत मावजीनाथ महाराज, मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी, पुजारी बांधव तसेच भाविक उपस्थित होते.

तत्पूर्वी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन निमित्त पहाटे श्री तुळजाभवानी मातेस सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान, पंचामृत स्नान व श्रीदेवीजींची अभिषेक पूजा हे धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने संपन्न झाले.

  • Related Posts

    जिल्हा परिषद धाराशिवच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

    Spread the love

    Spread the loveराष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानातील उल्लेखनीय कामगिरीची राज्य शासनाकडून दखल; पशुसंवर्धन विभागाला उत्कृष्टता प्रमाणपत्र प्रदान दुष्काळी परिस्थितीत पशुधन संवर्धन, कृत्रिम रेतन आणि दर्जेदार पशुवैद्यकीय सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीचा गौरव! धाराशिव…

    अवैध मद्यनिर्मितीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा धडाका ; विशेष मोहिमेत ६४ गुन्हे दाखल, ५३ आरोपींना अटक

    Spread the love

    Spread the love११ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्तजागजी तांड्यावर संयुक्त पथकाचा छापा,चार आरोपींना अटकदुष्काळ आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्रीविरोधात कारवाई तीव्र नागरिकांना सतर्कतेचे आवाहन धाराशिव – जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती,विक्री आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *