महामानवाच्या महाजयंती महोत्सवाला सुरुवात; फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत नगर परिषदेकडून स्वच्छता अभियान.

Spread the love

धाराशिव : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुले-शाहू-आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत नगर परिषदेकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.आज दि.7 तारखेपासून समितीच्या वतीने चालणा-या विविध सामाजिक उपक्रमास सुरुवात झाली असुन आकर्षक देखाव्याच्या कामास सुरुवात झाली तर दि.11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम, देखाव्याचे उद्घाटन,नारी सन्मान असे नियोजन असुन दि.12,13,14 तारखेला इतर सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गणेश रानबा वाघमारे यांनी दिली,स्वच्छता अभियान वेळी फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे,सचिव प्रवीण जगताप उपाध्यक्ष संजय गजधने, मार्गदर्शक सदस्य बलभीम कांबळे संपतराव शिंदे,स्वराज जानराव,अतुल लष्करे,बाबासाहेब गुळीग, सचिन चौधरी,विशाल सरवदे,तर नगर परिषदचे स्वच्छता निरीक्षक सह डुकरे, नितीन बनसोडे, महिला व फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.

  • Related Posts

    संविधान उद्देशिका वाचन करुन शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीची सुरुवात

    Spread the love

    Spread the love धाराशिव :- छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यात सामाजिक समता न्याय दिन साजरा केला जातो,या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद धाराशिव,समाज कल्याण विभाग धाराशिव यांच्या…

    छत्रपती संभाजी महाराजांनाजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *