नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सचिन तावडे यांचा कळंबमध्ये जंगी सत्कार; धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा निर्धार!

Spread the love

कळंब तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन; पक्षवाढीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन..

धाराशिव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी नवनियुक्त झाल्याबद्दल श्री. सचिन तावडे यांचा कळंब तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी त्यांना पुढील राजकीय व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी बोलताना नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सचिन तावडे यांनी आगामी काळात कळंब तालुक्यासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देणार असल्याचे सांगितले. पक्षाचे विचार, ध्येयधोरणे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

  • Related Posts

    श्रृंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन

    Spread the love

    Spread the loveतुळजापुर – श्रृंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांनी आज श्री क्षेत्र तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊन देवींची…

    मजुरीला गेल्याशिवाय चूल पेटणार कशी ?’… ऐंशी वर्षांच्या अनुसयाबाईंच्या शब्दांनी पालकमंत्री गहिवरले !

    Spread the love

    Spread the loveदुष्काळाच्या वेदना जाणून घेण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक थेट शेताच्या बांधावर ; कष्टकरी महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची दिवाळी भेट ‘माझी आई आज असती, तर तीही तुमच्याच वयाची असती…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *