विद्यामाता हायस्कूल धाराशिव येथे संविधान जनजागृती इंग्रजी भाषेत प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न,२७५ विद्यार्थ्यांचा सहभाग

Spread the love

मतदार जनजागरण समितीचा ‘जिथे जाचाल तिथे वाचाल भारतीय संविधान’ हा उपक्रम

धाराशिव : भारतीय संविधानाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, संविधानातील मुलभुत मुल्यांची माहिती मिळावी आणि संविधानाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने मतदार जनजागरण समिती धाराशिवच्या वतीने विद्यामाता हायस्कुल, धाराशिव येथे भारतीय संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा परीक्षा इंग्रजी भाषांमध्ये घेण्यात आली. ‘जिथे जाचाल तिथे वाचाल भारतीय संविधान’ या उपक्रमांतर्गत आयोजित या स्पर्धेत एकूण २७५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.या स्पर्धेमध्ये भारतीय संविधानाची उद्देशिका आणि उद्देशिका विश्लेषण प्रत यांवर

आधारित विस इंग्रजी प्रश्नांची प्रश्न पत्रिका होती.यापुर्वी शम्सुल उलुम उर्दु हायस्कूल येथे उर्दु भाषेत तर अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळेत मराठी भाषेत परिक्षा घेण्यात आली तर आज रोजी विद्यामाता हायस्कूल धाराशिव येथे इंग्रजी भाषेतुन परिक्षा घेण्यात आली.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हाधिकारी कार्यालयातील सरकारी अभियोक्ता ॲड.शांतीकुमार कांबळे उपस्थित होते. यावेळी मतदार जनजागरण समितीचे सचिव अब्दुल लतीफ, कार्याध्यक्ष गणेश रानबा वाघमारे, सहसचिव बाबासाहेब गुळीग, कोषाध्यक्ष शेख रौफ, संघटक अमर आगळे, तसेच विद्यामाता हायस्कूलचे प्राचार्य अमोल सर,
उपप्राचार्य व्हॅलेरियन सर,शायनस ब्रदर, नितीन सर योगेश सर,शिक्षकवृंद कोमल मॅडम,प्रीती मॅडम,वनिता मॅडम,हाजेरा मॅडम,पल्लवी मॅडम, निकीता मॅडम,शिंदे मॅडम,सुरवसे मॅडम सह इतर शिक्षक,कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी विद्यामाता हायस्कुलचे प्राचार्य अमोल सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनातुन मतदार जनजागरण समितीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संविधान जनजागृतीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली,समितीच्या कार्याची माहिती व पदाधिकाऱ्यांचा परिचय कार्यक्रमा दरम्यान मतदार जनजागरण समितीचे कार्याध्यक्ष गणेश रानबा वाघमारे यांनी

समितीच्या पदाधिकाऱ्यांचा परिचय करून दिला.संविधान जनजागृती, मतदार जागृती आणि विद्यार्थ्यांमध्ये संविधानविषयक ज्ञान वाढविण्यासाठी समितीच्या वतीने विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले,समितीचे सचिव अब्दुल लतीफ यांनी आभार प्रदर्शनात म्हण्टले की,विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबतच भारतीय संविधानाचे वाचन करावे, संविधानातील मूल्ये समजून घ्यावीत आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडावीत,उपस्थित मान्यवर,शाळेचे प्राचार्य,शिक्षक,कर्मचारी आणि सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

  • Related Posts

    श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर नारळाची पूजा; रात्री छबिना मिरवणूक

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – अश्विन शुद्ध सप्तमीला श्री येडेश्वरी देवीची विशेष पूजा; रक्तबीज दैत्याच्या वधाशी नारळाच्या पूजेची धार्मिक परंपरा जोडलेलीअश्विन शुद्ध सप्तमी, शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री येडेश्वरी…

    पाण्याचा वापर काटकसरीने करा; सण-उत्सवांच्या काळात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा – सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांचे आवाहन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याची बचत करणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पाणी व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *