
भूम :- मेरा युवा भारत कार्यालय,धाराशिव व आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,भूम ता. भूम जि.धाराशिव यांचे वतीने “नशा मुक्त युवा” कार्यक्रम थीम अंतर्गत पडोस युवा संसद कार्यक्रम मेरा युवा भारत कार्यालयाचे जिल्हा युवा अधिकारी श्री.प्रतिक करंजकर सर व शासकीय आ.वि.औ.प्र.संस्थेचे प्राचार्य श्री.हर्षद राजूरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. या वेळी माय भारत कार्यालयाचे कार्यक्रम सहाय्यक श्री.रविकांत सुरवसे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व माय भारत पोर्टल विषयी थोडक्यात माहिती विषद केली.
या प्रसंगी उपप्राचार्य श्री.डी.एस.मुळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिवचे पी.एल.व्ही(अधिकार मित्र) व मुलांसाठी बालस्नेही कायदेविषयक सेवा योजना 2024 अंतर्गत मुलांसाठी कायदेविषयक सेवा संघ सदस्य व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कायदेशीर सेवा योजना, 2015 विशेष सेल सदस्य प्रशांत मते, प्रा.आर.के.वीर, प्रा.एच.बी.कळबंड, प्रा.आर.एस. वीर, प्रा.ताकमोडे सर, प्रा.के.डी. वामीरकर व स्वप्नील गरड-पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच सदरील कार्यक्रमांमध्ये *श्री.संजीत आघाव* यांनी :-व्यसनाची कारणे, प्रकार, शारीरिक/मानसिक आरोग्य, कुटुंब व समाजावरील परिणाम आणि विकसित भारतावरील परिणाम यावर ज्ञान प्रसार.

प्रा.आदित्य लगाडे यांनी MY Bharat पोर्टल आणि त्याचे फायदे याबाबत समर्पित सत्र. उद्दिष्टे, वैशिष्ट्ये व संधी यांचा आढावा.

प्रा. निखिल खिल्लारे यांनी व्यसनमुक्त युवा व नशा मुक्त भारत घडविण्यात युवकांची भूमिका यावर संवादात्मक सत्र. प्रतिज्ञा, गटचर्चा, केस स्टडी, प्रश्नमंजुषा, भूमिका-अभिनय इत्यादी उपक्रम.

श्री.दयानंद बोराडे यांनी व्यसनाचे परिणाम, पुनर्प्राप्तीचे प्रवास व समुदाय पुढाकार यावर लघुपट / माहितीपट प्रदर्शन व चर्चा या विषयावर विचार व्यक्त केले.
वरील विविध विभागाच्या चार
मान्यवरांनी मोलाचे सखोल अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमाची सांगता “नशा मुक्त युवा” शपथ घेऊन करण्यात आली.
तसेच कॉलेजच्या वतीने उप प्राचार्य श्री.डी.एस.मुळे यांनी मार्गदर्शन करून आभार व्यक्त केले व कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.