फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त गुणवंतांचा सत्कार

Spread the love

धाराशिव :- ७० व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर सेवा भावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी प्रवेश मिळविलेल्या व शिक्षण पुर्ण केलेल्या गुणवंत विद्यार्थी व पिएचडी केलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन समितीच्या नियोजित जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करुन सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली, कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक बनसोडे, प्रमुख उपस्थिती अमर आगळे व उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.क्षितीजा मिलिंद

बनसोडे,डॉ.शर्वरी वाघमारे, डॉ.ऋतुराज नितिन वाघमारे व मराठी विषयात पिएचडी डॉ.रवी सुरवसे, इतिहास विषयात पिएचडी डॉ रविंद्र शिंदे यांचा शाल,गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले, फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे मार्गदर्शक सदस्य बलभीम कांबळे यांच्या दोन्ही मुली वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी झाल्या बद्दल त्यांनाही सन्मानित करण्यात आले तर विद्यार्थ्याच्या पाल्यांना देखील सन्मानित करण्यात आले.सत्कार मुर्तींनी आपापल्या मनोगत व्यक्त केले,यावेळी समितीचे अध्यक्ष गणेश रानबा वाघमारे,सचिव प्रवीण जगताप, उपाध्यक्ष संजय गजधने, कोषाध्यक्ष अंकुश उबाळे, मार्गदर्शक सदस्य बलभीम कांबळे,धनंजय वाघमारे,संपतराव शिंदे, बाबासाहेब आप्पा बनसोडे,स्वराज जानराव,अतुल लष्करे,विशाल घरबुडवे,श्रीकांत गायकवाड मटकीवाले, बाबासाहेब बनसोडे,विनायक गायकवाड,नाना वाघमारे,मिलिंद बनसोडे, निखिल बनसोडे,नितिन वाघमारे,मुकेश मोटे, अमोल लष्करे सह इतर उपस्थित होते,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त अशोक बनसोडे होते,सुत्रसंचलन बलभीम कांबळे यांनी तर आभार गणेश वाघमारे यांनी मानले.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी बसवराज पुजारी यांची ५० हजार रुपयांची देणगी; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देणगीदाराचा सत्कार

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचे भक्त बसवराज पुजारी, रा. घानपूर, ता. चिंचोली, जि. कलबुर्गी (कर्नाटक) यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी ५० हजार रुपयांची देणगी अर्पण…

    निवडणूक आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही,याची दक्षता घ्या,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    Spread the love

    Spread the loveनोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याचे निर्देश धाराशिव – भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,येत्या २३ ऑक्टोबर रोजी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *