धाराशिव शासकीय रुग्णालयाच्या प्रयत्नांतून १० वर्षांनंतर बेघर रुग्णाचे कुटुंबाशी पुनर्मिलन वैद्यकीय उपचारांसोबत सामाजिक पुनर्वसनाची जबाबदारीही रुग्णालयाने निभावली

Spread the love

धाराशिव – गेल्या दहा वर्षांपासून कुटुंबीयांपासून आणि स्वतःच्या घरापासून दूर असलेल्या दिनेश ऊर्फ बाळू कदम यांची धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर आणि समाजसेवा अधीक्षक यांच्या प्रयत्नांमुळे आपल्या कुटुंबाशी पुन्हा भेट घडून आली.रुग्णालयाच्या पुढाकारामुळे अखेर त्यांच्या कुटुंबाचा शोध लागला असून त्यांचा भाचा स्वप्नील भालेराव यांनी त्यांना घरी नेले.या उपक्रमातून रुग्णालयाने वैद्यकीय उपचारांसोबतच सामाजिक पुनर्वसनाचेही महत्त्व अधोरेखित केले आहे.सदरील रुग्ण उजव्या हाताच्या सेल्युलायटिस (Cellulitis) या आजारावरील उपचारांसाठी दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे दाखल झाले होते. त्यांच्यासोबत कोणताही नातेवाईक नसल्याने त्यांच्या उपचारांसोबतच सामाजिक पुनर्वसनाचा प्रश्नही महत्त्वाचा होता.शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान, वैद्यकीय अधीक्षक डॉ.तानाजी लाकाळ, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. प्रविण डुमने आणि शल्यचिकीत्साशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रोहन खैराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुष शल्यचिकीत्साशास्त्र विभागाच्या युनिट क्रमांक दोन मधील डॉ. अजित डिकले,डॉ.अनुराग कासनाळे,डॉ. श्रद्धा तसेच वॉर्ड इन्चार्ज श्रीमती कौरव,श्रीमती कोकाटे,स्टाफ नर्स श्रीमती इंगळे, श्रीमती जोगदंड आणि ड्रेसर गुरु शेटे यांनी रुग्णावर आवश्यक औषधोपचार केले.दरम्यान, समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) महेश अटकळ,मनेश खंडागळे, शरद मासाळ आणि समुपदेशक अमित मुळे यांनी रुग्णाच्या सामाजिक पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला, रुग्णाशी संवाद साधून त्यांच्या कुटुंबीयांची माहिती मिळविणे आणि नातेवाईकांचा शोध घेणे या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले. सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर खेड, जिल्हा पुणे येथील रुग्णाचे भाचे स्वप्नील भालेराव यांचा शोध घेण्यात यश आले. त्यांच्याशी संपर्क साधून रुग्णाच्या परिस्थितीची माहिती देण्यात आली.अखेर दि.१७ ऑक्टोबर २०२६ रोजी रुग्णाचे भाचे स्वप्नील भालेराव रुग्णालयात आले आणि त्यांनी दिनेश ऊर्फ बाळू कदम यांना घरी नेले.तब्बल दहा वर्षांनंतर कुटुंबाशी पुनर्मिलन घडून आल्याने रुग्ण आणि नातेवाईक अत्यन्त आनंदी झाले. याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाचे आभार मानले. या घटनेतून शा. वै. म. व रुग्णालयाची भूमिका केवळ आजारांवर उपचार करण्यापुरती मर्यादित नसून गरजू आणि निराधार रुग्णांना सामाजिक आधार मिळवून देणे, त्यांचे कुटुंबाशी पुनर्मिलन घडवून आणणे आणि त्यांचे सामाजिक पुनर्वसन साधणे हीदेखील महत्त्वाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी आणि समाजसेवा अधीक्षकांच्या समन्वित प्रयत्नांचे या निमित्ताने कौतुक होत आहे.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी देवींचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न

    Spread the love

    Spread the loveशारदीय नवरात्र महोत्सव – २०२६ श्री तुळजाभवानी देवींचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा बुधवार, दि. २१ ऑक्टोबर…

    अमृत दुर्गोत्सव २०२६’मधून उलगडणार महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.१९ ऑक्टोबर (जिमाका) दिवाळीच्या सुट्टीत मुलांच्या कल्पकतेला वाव मिळावा,त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाचा वारसा साकारला जावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी,या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *