नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापुरात ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ

Spread the love

उमेदच्या विशेष विक्री व प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी श्री.पुजार यांच्या हस्ते उद्घाटन

दुष्काळाच्या संकटात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळ

धाराशिव – दुष्काळाच्या संकटाशी सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांतील महिलांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा,त्यांच्या हातांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने त्यांची वाटचाल अधिक सक्षम व्हावी,या उद्देशाने तुळजापूर येथे नवरात्र महोत्सवानिमित्त ‘उमेद’ अभियानांतर्गत ग्रामीण महिलांच्या उत्पादनांचे विशेष विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा हा अभिनव उपक्रम आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद),जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष,धाराशिव आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर येथील छत्रपती संभाजी महाराज बसस्थानकात या विशेष विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते १३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक निलेश काळे, तहसीलदार अरविंद बोळंगे,तुळजापूर आगार व्यवस्थापक महेश रामपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी जिल्हा अभियान व्यवस्थापक वनिता डोंगरे,जिल्हा प्रोग्रामर मेघराज पवार,जिल्हा व्यवस्थापक समाधान जोगदंड,राज्य परिवहन महामंडळाचे जी. एम.घुगे,तालुका अभियान व्यवस्थापक पूजा घोगरे,तालुका व्यवस्थापक प्रणीता कटकधोंड,बाबासाहेब नाईक,नागेश काकडे यांच्यासह तुळजापूर तालुक्यातील सर्व प्रभाग समन्वयक,प्रभागसंघ व्यवस्थापक आणि समुदाय संसाधन व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

भाविकांनी महिलांच्या उत्पादनांची खरेदी करून प्रोत्साहन द्यावे : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी बसवराज पुजारी यांची ५० हजार रुपयांची देणगी; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देणगीदाराचा सत्कार

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचे भक्त बसवराज पुजारी, रा. घानपूर, ता. चिंचोली, जि. कलबुर्गी (कर्नाटक) यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी ५० हजार रुपयांची देणगी अर्पण…

    निवडणूक आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही,याची दक्षता घ्या,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    Spread the love

    Spread the loveनोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याचे निर्देश धाराशिव – भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,येत्या २३ ऑक्टोबर रोजी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *