
धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हा माहिती कार्यालय,धाराशिवच्यावतीने जिल्ह्यातील माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी पत्रकार कार्यशाळेचे आयोजन १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता जिल्हा नियोजन समिती,सभागृह धाराशिव येथे करण्यात आले आहे.या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार हे करतील.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.
या कार्यशाळेत जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे हे “माध्यमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ” या विषयावर आणि परभणी येथील प्रा.दीपक रंगारी हे ” वृत्तपत्रामध्ये प्रमाण लेखनाचे महत्त्व ” या विषयावर विस्तृत मार्गदर्शन करणार आहे.पत्रकारांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती विभागीय माहिती कार्यालय लातूरचे सहायक संचालक डॉ.श्याम टरके हे देतील. जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी या कार्यशाळेला उपस्थित रहावे.असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले आहे.