
अहिल्यानगर – अॅफॉट्रॉफी डान्स अकॅडमीतर्फे यंदाही गरबा आणि दांडिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 18 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर 2025 दरम्यान घेण्यात येणार असून, याआधी 17 ऑगस्ट रोजी मोफत डेमो क्लासेस आयोजित करण्यात आले आहेत.
हे शिबिर दोन ठिकाणी होणार असून, ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत – रावसाहेब पटवर्धन स्मारक, प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर आणि माऊली सांस्कृतिक भवन, नंदनवन लॉन शेजारी, टिळक रोड, अहिल्यानगर.
हे शिबिर 3 वर्षापुढील सर्वांसाठी असून, गरबा आणि दांडियाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण डान्स अकॅडमी गेल्या दहा वर्षांपासून देत आहे. 10 ऑगस्टपूर्वी नाव नोंदविल्यास शुल्क केवळ 699 रुपये व 10 ऑगस्ट नंतर 799/- असेल, हे शिबिर अहिल्यानगरमधील सर्वात माफक शुल्काचे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
डेमो क्लास माऊली सांस्कृतिक भवन येथे सकाळी 9 ते 11 आणि रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे सायंकाळी 5 ते 7 या वेळेत होणार आहेत. बेसिकपासून डव्हान्स लेव्हलपर्यंत गरबा-दांडियाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षित व अनुभवी प्रशिक्षक या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी 8308882968 आणि 8793127227 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अॅफॉट्रॉफी डान्स अकॅडमीच्या संचालकांनी केले आहे.