
धाराशिव – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे ७ ऑगस्ट रोजी आगमन प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना,अपर जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव,उपजिल्हाधिकारी सर्वश्री शिरीष यादव,संतोष राऊत,अरुणा गायकवाड,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,धाराशिव उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार मृणाल जाधव यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.