श्री आई तुळजाभवानी तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यांतर्गत तुळजापूर येथे १०८ फूट उंच शिल्प उभारणीसाठी शिल्पकारांकडून मागविण्यात आले फायबर मॉडेल

Spread the love

तुळजापूर – श्री आई तुळजाभवानी तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यांतर्गत, तुळजापूर येथे १०८ फूट उंचीचे भव्य ब्राँझ धातूचे शिल्प उभारण्यात येणार आहे. हे शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांना श्री तुळजाभवानी देवी आशीर्वाद देत असलेल्या प्रसंगावर आधारित असणार आहे. या शिल्पाच्या मूळ आराखड्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली २.५ ते ३ फूट उंचीच्या फायबर मॉडेल्स मागविण्यात आली आहेत.

अनुभवी शिल्पकारांना संधी

सदर फायबर मॉडेल तयार करण्यासाठी इच्छुक शिल्पकारांकडे शिल्पकलेतील पदवी अथवा पदविका असणे आवश्यक आहे. याशिवाय किमान १५ वर्षांचा व्यावसायिक अनुभव असणे अपेक्षित आहे. तयार करण्यात आलेल्या फायबर मॉडेल्समधून एकूण ५ मॉडेल्सची निवड निवड समितीद्वारे करण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक मॉडेल सादरकर्त्याला १.५ लाख रुपये इतके मानधन देण्यात येईल.

तसेच अंतिम निवड झालेल्या फायबर मॉडेल सादरकर्त्याला १० लाख रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. हे मॉडेल ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भांचा विचार करून तयार करणे बंधनकारक आहे. यासाठी शिल्पकारांनी इतिहासकार तसेच पुरातत्व विभागाकडून प्राप्त झालेले संदर्भ अभ्यासून मॉडेल तयार करावे.

मॉडेल सादरीकरणासाठी १ ते ३१ ऑगस्टपर्यंत कालमर्यादा

सदर फायबर मॉडेल्स १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे सादर करावयाची आहेत. या संपूर्ण प्रक्रियेचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी राखून ठेवले आहेत.

  • Related Posts

    संत ज्ञानेश्वर नगरात ‘शिवशक्ती शिवालय’मध्ये शिवलिंग स्थापना : महिलांच्या पुढाकारातून साकारले मंदिर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  – संत ज्ञानेश्वर नगर येथे उभारण्यात आलेल्या शिवशक्ती शिवालय या मंदिरात ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता शिवलिंग स्थापना सोहळा पार पडणार आहे. या शुभप्रसंगी धाराशिव…

    आई तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनातील तलवार गायब? मंदिर समितीचा खुलासा – ‘तलवार सुरक्षित आहे’

    Spread the love

    Spread the loveआई तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनातील तलवार गायब? मंदिर समितीचा खुलासा – ‘तलवार सुरक्षित आहे’ धाराशिव – तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनासाठी वापरण्यात येणारी तलवार गायब झाल्याचा आरोप भोपे पुजारी मंडळाने केल्यानंतर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *