सोलापूर महापालिकेत तिरंगा राखी कार्यशाळा; ७५ महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

Spread the love

सोलापूर : दीनदयाळ अंत्योदया योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिका वतीने बचत गटातील महिलांसाठी “हर घर तिरंगा” मोहिमेच्या अनुषंगाने तसेच रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून तिरंगा राखी बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

महानगरपालिका सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेत शहरातील ३० हून अधिक बचत गटांमधील सुमारे ७५ महिलांनी सहभाग घेतला. सक्रीय सदस्यांनी उपस्थित महिलांना प्रत्यक्ष तिरंगा राखी बनविण्याचे प्रशिक्षण दिले.

‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा उद्देश
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाची ही मोहीम नागरिकांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना दृढ करणे, राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे आणि तिरंग्याशी वैयक्तिक नाते जोडणे हा आहे. महाराष्ट्र राज्याने या मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी केली असून यावर्षी (२०२५) २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान तीन टप्प्यांमध्ये ती राबवली जात आहे.

कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती
यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका आकुलवार, शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समुदाय संघटक निता गवळी, सुनिता कोरे, ज्योती शिर्कुल, ज्योती चौगुले, आशिया शेख, तब्बसुम बडेघर तसेच वालचंद महाविद्यालय समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शीलाताई वाघमारे यांनी केले तर आभारप्रदर्शन गणेश हजारे यांनी मानले.

  • Related Posts

    क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा तर्फे आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव:- समता नगर क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा कडुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नगर सेवक नाना घाटगे यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग…

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय समारंभ 17 सप्टेंबरला – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *