‘पत्रकारांनी स्वतःच्या कुटुंबासाठीही वेळ द्यावा’ : नलावडे

Spread the love

बार्शीत व्हॉइसऑफ मीडिया वतीने पत्रकारांच्या पाल्यास शालेय साहित्य वाटप

बार्शी  – ( प्रतिनीधी ) : पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. पत्रकारांना समाजातील सर्वच घडामोडीबाबत जागृत राहून महत्त्वाचे कर्तव्य पार पाडावे लागते. परंतू स्वतःच्याच कुटुंबाकडे दुर्लक्ष न करता पत्रकारांनी आपल्या कुटुंबासाठी वेळ देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन निवृत्त शिक्षणाधिकारी व सुयश विद्यालयाचे अध्यक्ष शिवदास नलावडे यांनी येथे केले.

व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्यावतीने पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार आणि शहर, तालुक्यातील पत्रकारांच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप शुक्रवारी (दि. १२) संघटनेच्या राज्य कार्यालयात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवृत्त तहसीलदार मदनराव वायकुळे, व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ,शाम थोरात ,अमोल आजबे, मयूर थोरात, प्रवीण पावले ,प्रदीप माळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
समाजात वावरत असताना पत्रकारांवर अनेक जबाबदाऱ्या असतात. रात्री बेरात्री कोणतीही घटना घडली तरी ते सतत कार्यरत असतात. पण कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. मात्र पत्रकारांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीही वेळ द्यावा, असे आवाहन नलावडे यांनी केले. स्मार्ट अकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे म्हणाले, मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर आपल्या मुलांसोबत मैत्रीपूर्ण वातावरण ठेवावे, असे स्पष्ट केले.
प्रस्ताविकात अजित कुंकूलोळ म्हणाले, बार्शीत केवळ संघटनेतील सदस्य असलेल्या पत्रकारांच्या पाल्यांनाच नव्हे तर तालुक्यातील सर्वच पत्रकारांच्या १०० मुलांना सुमारे एक लाख रुपयांचे शालेय साहित्य वाटप केले आहे. जिल्यात पहिल्यांदाच हा उपक्रम राबवल्याचे कुंकूलोळ यांनी सांगितले. सूत्रसंचालन संदीप अलाट यांनी केले तर आभार शाम थोरात यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश झिंगाडे, विजय शिंगाडे, समाधान चव्हाण ,विक्रांत पवार ,ओंकार हिंगमीरे ,जमीर कुरेशी,अपर्णा दळवी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

  • Related Posts

    पत्रकारितेच्या सक्षमीकरणाचा निर्धार; व्हॉईस ऑफ मीडिया च्या राष्ट्रीय अधिवेशनाची उत्साहात सांगता

    Spread the love

    Spread the loveपत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर नवी दिल्ली : देशभरातील पत्रकारांना एकाच व्यासपीठावर आणणारे, पत्रकारितेच्या वर्तमान आणि भविष्यातील दिशेचा वेध…

    पत्रकारांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी; ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव | प्रतिनिधीपरंडा तालुक्यातील निजाम जवळा येथील शेतकरी बाबुशा सुपनास पवार यांच्या शेतातील शेड पाडण्यात आल्याची घटनेची वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार प्रभाकर लोंढे आणि कॅमेरामन अण्णाभाऊ लोंढे यांच्याविरोधात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *