संत ज्ञानेश्वर नगरात ‘शिवशक्ती शिवालय’मध्ये शिवलिंग स्थापना : महिलांच्या पुढाकारातून साकारले मंदिर

Spread the love

धाराशिव  – संत ज्ञानेश्वर नगर येथे उभारण्यात आलेल्या शिवशक्ती शिवालय या मंदिरात ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता शिवलिंग स्थापना सोहळा पार पडणार आहे. या शुभप्रसंगी धाराशिव शहरातील सर्व नागरिक, भक्तगण आणि श्रद्धावानांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवशक्ती शिवालय समितीने केले आहे.

विशेष बाब म्हणजे, हे मंदिर महिला शक्तीच्या एकतेचे प्रतीक ठरले आहे. मंदिराचे भूमिपूजन ८ ऑगस्ट २०२४ रोजी झाले होते, त्यानंतर महिलांच्या पुढाकारातून आणि लोकसहभागातून मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. या मंदिराच्या स्थापनेपासून ते निधी संकलनापर्यंत संपूर्ण जबाबदारी महिलांनी पार पाडली आहे.

महिलांचा सक्रिय सहभाग

या मंदिर निर्मितीत श्रमदान व सेवा दिलेल्या महिलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
सौ. अंजली नामदेव माने देशमुख, सौ. सोनल नलिन पिंपळे, सौ. पूजा राजे, सौ. संध्या हवालदार, सौ. वैशाली भुतेकर, सौ. गडकर ताई, सौ. सुनंदा लोमटे, सौ. आशा ढोणे, सौ. गवळण काळे, सौ. वंचना माने, सौ. सुषमा माने, सौ. पल्लवी माने, सौ. संजना लोहरे, सौ. वनिता वतने, सौ. सोना कोल्हे, सौ. दीपा लाटे, सौ. शशिकला विरोदे, सौ. लता वैद्य, सौ. सरस्वती शंकर सलगर आदी.

दात्यांचे योगदान

या पवित्र कार्यात निधी अर्पण करून मोलाचे योगदान देणाऱ्या दात्यांची नावे पुढीलप्रमाणे –
सौ. राजश्री राजेंद्र बागल, सौ. अंजली दिनेश उर्फ दत्ता काकडे, सौ. शकुंतला श्रीराम मुंडे, सौ. अनिता विक्रमराव शिंदे, सौ. राजश्री विनोद निंबाळकर, सौ. संगीता प्रवीण काळे, सौ. अंजली नितीन काळे, सौ. सरोजिनी दिलीप जगताप, सौ. सारिका अनंत जगताप, श्रीमती प्रेमा विजय जगताप, सौ. मंगल दीपकराव कावळे, सौ. प्रणिता सत्यजित काळे, सौ. लतिका पाटील, सौ. वैजयंती तावडे आदींचा समावेश आहे.

सर्वांसाठी आमंत्रण

ही शिवलिंग स्थापना केवळ धार्मिक विधी नसून, समाजातील महिलांच्या सामूहिक प्रयत्नांची प्रेरणादायक गोष्ट आहे. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी सर्व श्रद्धावान नागरिकांनी उपस्थित राहून पुण्यलाभ घ्यावा, असे आवाहन शिवशक्ती शिवालय समिती, संत ज्ञानेश्वर नगर, धाराशिव यांनी केले आहे.

  • Related Posts

    आई तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनातील तलवार गायब? मंदिर समितीचा खुलासा – ‘तलवार सुरक्षित आहे’

    Spread the love

    Spread the loveआई तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनातील तलवार गायब? मंदिर समितीचा खुलासा – ‘तलवार सुरक्षित आहे’ धाराशिव – तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनासाठी वापरण्यात येणारी तलवार गायब झाल्याचा आरोप भोपे पुजारी मंडळाने केल्यानंतर…

    श्री आई तुळजाभवानी तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यांतर्गत तुळजापूर येथे १०८ फूट उंच शिल्प उभारणीसाठी शिल्पकारांकडून मागविण्यात आले फायबर मॉडेल

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – श्री आई तुळजाभवानी तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यांतर्गत, तुळजापूर येथे १०८ फूट उंचीचे भव्य ब्राँझ धातूचे शिल्प उभारण्यात येणार आहे. हे शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांना श्री तुळजाभवानी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *