
धाराशिव -: महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या आदेशानुसार धाराशिव नगरपरिषदेत नवीन मुख्याधिकारी म्हणून श्रीमती नीता अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या यापूर्वी बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होत्या. शासनाने प्रशासनिक कारणास्तव (रिक्त पदावर) ही बदली केली आहे.
दिनांक ०१ ऑगस्ट २०२४ रोजी निर्गमित शासन आदेशानुसार श्रीमती अंधारे यांनी तत्काळ पदभार स्विकारावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांना ०१ ऑगस्ट २०२५ रोजी बीड येथून बदलीचे आदेश मिळाले आहेत, त्यानुसार मूळ नियुक्ती स्थळावरून कार्यमुक्त होत त्यांना आता तत्काळ ०४ ऑगस्ट रोजी धाराशिव येथे रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.
या बदलीमुळे धाराशिव नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजात अधिक गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. श्रीमती अंधारे यांचा बीड नगर परिषद येथील कामाचा अनुभव आणि कार्यशैलीचा लाभ धाराशिव शहराला होईल, असे स्थानिक प्रशासकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान, याबाबतचा अधिकृत आदेश शासनाचे अवर सचिव अ.का. लक्कस यांच्या सहीने निर्गमित करण्यात आला आहे.