धाराशिव : पोलीस विभागातील पाच जेष्ठ अधिकारी-अंमलदारांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात पार

Spread the love

धाराशिव – पोलीस विभागातील पाच जेष्ठ अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात पार पडला. राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षक मधुकर काशिनाथ घायाळ, पोलीस सहाय्यक फौजदार बिभीषण भगवान लोंढे, राजेंद्र मोहनराव राऊत, उमाकांत लक्ष्मणराव माळाळे आणि पोलीस हवालदार उल्हास दगडू वाघचौरे यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांनी भूषवले. त्यांच्या हस्ते निवृत्त अधिकारी-अंमलदारांना सन्मानचिन्ह व शुभेच्छा देण्यात आल्या. सेवानिवृत्त अधिकारी आपल्या कार्यकाळातील आठवणी सांगताना भावनाविवश झाले.

कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांच्यासह अधिकारी व अंमलदारांची उपस्थिती होती. निवृत्त होणारे अधिकारी आपापल्या कुटुंबियांसह समारंभात सहभागी झाले होते.

  • Related Posts

    फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव :- लोकराजा,आरक्षणाचे जनक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर सेवा भावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन…

    आपुलकी संस्थेकडून सन्मान ,,,

    Spread the love

    Spread the love        समाजाचं देणं हे अभिप्रेत वाक्य घेऊन देशाची सेवा आर्मी क्षेत्रा मधून उत्कृष्ट अशी कामगिरी करणारे ,आपुलकी संस्थेकडून सन्मान ,,, विश्व प्रशांत न्यूज प्रतिनिधी धाराशिव आर्मी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *