मराठा आरक्षणासाठी संघर्ष पुन्हा तेजीत – मनोज जरांगे पाटील ६ ऑगस्टला सोलापुरात

Spread the love

सोलापूर प्रतिनिधी – मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवसंजीवनी देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे बुधवार, ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सोलापूरच्या सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात दाखल होणार आहेत. या दौऱ्यात जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांशी थेट संवाद साधून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.

डाक बंगला येथे दिवसभर बैठका आयोजित करण्यात आल्या असून, या बैठकीत सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांशी मनोज जरांगे पाटील चर्चा करणार आहेत. आंदोलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांनाही या बैठकीत मार्गदर्शन मिळणार आहे.

जरांगे पाटील समाजबांधवांकडून येणाऱ्या सूचना व अपेक्षांवर लक्ष केंद्रित करून, सर्वसमावेशक विचारविनिमयानंतर आंदोलनाच्या पुढील टप्प्याची घोषणा करतील.

सकल मराठा समाज – सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने सर्व मराठा बांधवांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या महत्त्वाच्या बैठकीस उपस्थित राहून आपला सक्रीय सहभाग नोंदवावा व आरक्षणाच्या लढ्याला अधिक बळ द्यावे.

  • Related Posts

    लातूर येथे धारशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेतली.

    Spread the love

    Spread the love

    मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा – “आंतरवली सराटीची पुनरावृत्ती करू नका”

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चापूर्वी सरकारसोबत कोणतीही चर्चा न करण्याची ठाम भूमिका मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *