
धाराशिव – नीती आयोगाद्वारे राबविण्यात येत असलेल्या “संपूर्णता अभियान” अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव महसूल परिषद २०२५ मध्ये करण्यात आला.
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते IIM नागपूर येथे झालेल्या या विशेष कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार (भा.प्र.से.) यांना आकांक्षित जिल्हा ब्राँझ पदक प्रदान करण्यात आले.
धाराशिव जिल्ह्याने विविध सामाजिक-आर्थिक निकषांवर आधारित आरोग्य, शिक्षण, पोषण, शेती, पायाभूत सुविधा आणि प्रशासनिक कार्यक्षमतेच्या क्षेत्रात केलेल्या नवोन्मेषी आणि परिणामकारक कार्याची ही पावती आहे.
हा सन्मान संपूर्ण धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या एकात्मिक प्रयत्नाचे प्रतीक असून, विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
सर्व सहकाऱ्यांचे, विभागप्रमुखांचे, कर्मचाऱ्यांचे आणि जनतेचे मन:पूर्वक आभार!
आपल्या सहकार्यामुळेच हा सन्मान शक्य झाला.