
व्हाईस ऑफ मीडियाचे सदस्य असलेल्या एका वरिष्ठ दैनिकाच्या छायाचित्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पत्रकार बांधवांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
पत्रकारांवरील हल्ले हे लोकशाहीवरील हल्ले असून, दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकारांचे एकत्र येणे हीच एकजूट आणि पत्रकारितेच्या अस्मितेची साक्ष आहे!