
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवर आली नामुश्किची वेळ !
राष्ट्रवादीच्या होर्डिंगची छावाने केली ऐशी की तैशी
धाराशिव (प्रतिनिधी) – लातूर येथे अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी तटकरे यांच्याकडे एका केली. त्याचा राग मनात धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरज चव्हाण यांनी त्या घाडगे यांना बेदम मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ धाराशिव शहरात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्या स्वागतार्थ लावलेले बॅनर फाडून निषेध व्यक्त केला. तसेच छावाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन करीत घेराव घातल्यामुळे तात्काळ पोलिसांची तुकडी दाखल झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयास पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. दरम्यान तटकरे हे दुपारी पावणे दोन ते दोन या दरम्यान या कार्यालयात येणार असल्याने छावाचे कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतात ? याकडे सर्वांच्या नजरा खेळलेल्या आहेत.